Mumbai Tak Baithak: ठाकरेंची शिवसेना कायम का फुटते? आदित्य ठाकरे म्हणाले...

aaditya thackeray on shiv sena splits : मुंबई तक बैठकीत आदित्य ठाकरे यांनी शिवसेना फुटीच्या प्रश्नावर भाष्य करताना पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला. निधी, नैतिकता, भाजपचे राजकारण आणि आगामी राजकीय घडामोडींवरही त्यांनी भूमिका मांडली.

aaditya thackeray on  shiv sena splits

aaditya thackeray on shiv sena splits

मुंबई तक

01 Jul 2026 (अपडेटेड: 01 Jul 2026, 04:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंची शिवसेना कायम का फुटते?

point

आदित्य ठाकरे म्हणाले...

aaditya thackeray shivsena splits : शिवसेना वारंवार का फुटते, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदार आणि आमदारांवर टीका केली. निधीचे कारण देत पक्ष सोडल्याचा दावा करणाऱ्यांवर त्यांनी खासगी निधीसाठी गेल्याचे आरोप केले. ते मुंबई तक बैठकीत बोलत होते. 

हे वाचलं का?

''ऑपरेशन टायगर' नसून 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' सुरू"

महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर' नसून 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' सुरू असल्याचा दावा करत 2022  मध्ये पक्षातून गेलेल्या एका नेत्याचा उल्लेख त्यांनी केला. ते (एकनाथ शिंदे) पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोदीनंतर पंतप्रधान कोण होणार, हा मोठा प्रश्न आहे. विविध राज्यांमध्ये भाजपने मूळ पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री केले नाही. बाहेरुन आलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं आहे." असेही ते म्हणाले.

हेही वाचा : ईडी-सीबीआयमुळे लोकं येतात, तर मग संजय राऊतांचा प्रवेश का होत नाही? सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य

निधीवरुन फुटलेल्या खासदावर ठाकरेंची टीका

निधीवरून जो पक्षपात सुरू आहे, तो इतिहासात कधी झाला नाही. सहा खासदार गेले, मात्र त्यांना मिळालेला एमपी लॅड निधीही ते खर्च करू शकले नाहीत. मग निधीचं कारण सांगून जाणं हे केवळ निमित्त होतं. एका आमदाराला पाच कोटी कमी पडतात, तर सहा विधानसभा क्षेत्र असलेल्या खासदारांचा निधी शिल्लक कसा राहतो? खासदारांना खासगी निधी हवा होता, त्यामुळे ते गेले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सहा खासदार हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते, ते मोदी किंवा भाजपच्या चेहऱ्यावर निवडून आले नव्हते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Mumbai Tak Baithak: '...तर दुधात साखरच!', पवारांच्या NCP विलिनीकरणाबाबत काँग्रेसच्या सतेज पाटलांचा मोठा दावा

यावेळी आदित्य ठाकरे यांनी राम मंदिर, हिंदुत्व आणि भाजपवरही निशाणा साधला. "रामाच्या पादुका, रामाच्या गळ्यातले दागिने चोरले गेले. राम मंदिराजवळच्या जमिनी कोणी विकत घेतल्या, हे तपासलं पाहिजे. हेच लोक आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहेत," अशी टीका त्यांनी केली.

वाराणसीमध्ये कॉरिडॉरच्या नावाखाली अनेक पुरातन मंदिरे तोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. "राम मंदिरातील चोरीबाबत यांना लाज वाटत नाही का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

भाजपच्या "घाणेरड्या राजकारणाला" आपण स्मार्ट पॉलिटिक्स म्हणणार नसल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी विकत घेण्याच्या राजकारणावर टीका केली. नीट आणि टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या घटनांचाही उल्लेख करत राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.