मुंबई Tak बैठक : "अमोल कोल्हे यांच्या सावित्रीबाई फुले मालिकेसाठी समता परिषदेच्या माध्यमातून लढतोय. जेव्हा दलित किंवा इतर लोकांना शिक्षण देण्यासाठी हात आखडता केला जात असेल तर छगन भुजबळ तिथे थांबणार नाही, वेळ पडली तर लढू," असं मुंबई तक बैठक कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ म्हणाले.
ADVERTISEMENT
काय म्हणाले छगन भुजबळ?
"भिडे वाड्यासाठी मी गेली 23 वर्षांपासून मी लढत होतो. मोदी साहेबांनी मला १५० कोटी दिले. मला या सरकारमध्ये असं आढळलं नाही की, या सरकारने भेद केला. सर्व लहान लहान समाजाला घेऊन सरकार जातं. त्या सरकारने देखील काम केलं, पण हे सरकार देखील अधिकपणे काम करत आहेत," असं छगन भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा : Mumbai Tak Baithak: 'तू ये इकडे.. तुला मंत्री बनवतो..', कोणत्या NCP नेत्याने दिलेली मुनगंटीवारांना ऑफर?
"लोकांच्या डोक्यात जातिवाद घातला जातो"
"समतेच्या विचारधारेला विरोध करणारे त्यावेळी देखील होते, या देशात 140 कोटी लोक आहेत. सर्वांचेच विचार बदलतील असं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच काम सुरू आहे. आंतराजातीय विवाह केला जातोय, त्याला विरोध केला जात नाही. जवढे लोक अधिक शिकतील त्यातून फायदाच होणार आहे. पण काही लोकांच्या डोक्यात जातिवाद घातला जातोय. "
"मी अनेकदा मंत्री मंडळात बोललोय की, आश्रम शाळांऐवजी सर्वांना एकत्रच बसवा. वेगवेगळ्या धर्माच्या शाळा निर्माण करण्यापेक्षा एकाच ठिकाणी शिक्षण घ्यावं, काही प्रमाणात झालं. मी म्हणत नाही की, शिव, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचेच लोक असतील, काही दुसऱ्या विचारधारेचे देखील लोक आहेत. वाजपेयी यांनी सांगितलं की, जो इतिहास विसरला त्याला भविष्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी किती मोठं काम केलं. मंगळसूत्र विकून शिक्षण दिलं, हि शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेची माणसं होती."
हे ही वाचा : मुंबई Tak बैठक : 'सुरज चव्हाणने का येऊ नये इंडस्ट्रित?', जितेंद्र जोशी काय म्हणाला?
समता परिषदेच्या माध्यमातून मालिकेसाठी लढतोय
"अमोल कोल्हे यांच्या सावित्रीबाई फुले मालिकेसाठी समता परिषदेच्या माध्यमातून लढतोय. वेळ जेव्हा दलित किंवा इतर लोकांना शिक्षण देण्यासाठी हात आखडता केला जात असेल तर छगन भुजबळ तिथे थांबणार नाही, वेळ पडली तर लढू," असं छगन भुजबळ म्हणाले.
ADVERTISEMENT











