'विरोधी पक्षांच्या 90 टक्के लोकांना पैसे...', निधीवरुन अखेर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis : विरोधी पक्षातील लोकांना खरंच निधी दिला जात नाही का? ठाकरेंचे खासदार त्यामुळेच फुटले का? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

मुंबई तक

01 Jul 2026 (अपडेटेड: 01 Jul 2026, 08:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'विरोधी पक्षांच्या 90 टक्के लोकांना पैसे...'

point

निधीवरुन अखेर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis, मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी मोठी फुट पडली. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेसेनेत सामील झाले. यावेळी त्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण सांगून उद्धव ठाकरेंची साथ सोडली. दरम्यान, विरोधी लोकांना खरंच निधी मिळत नाही का? मिळाला तर किती मिळतो? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak बैठकमध्ये स्पष्टीकरण दिलंय. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

विरोधी लोकांना निधी मिळत नाही का? फडणवीसांचं उत्तर 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्षांतराच्या अनेक कारणांपैकी ते निधी हे एक कारण असू शकतं. या अर्थ निधी पुरता मर्यादित नसतो. प्रोजेक्ट असतात. इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय असतात. अशा सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आपण विरोधात असतो. तेव्हा आपल्या कामांवर पडत असतो. आपल्या आमदार, खासदारांना जास्त निधी मिळावा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असतो. हे एकमेव कारण आहे, असं माझं मत नाही. राजकारणात प्रत्येक जण स्वत:चं भविष्य पाहात असतो. ज्यांच्या नेतृत्वात काम करतोय ते आपलं भविष्य सेक्युअर करु शकत नाही, असं जेव्हा लोकांना वाटतं तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. आम्ही ज्यासाठी आहोत. त्यासाठी ते लढाई करत आहेत का? ते त्याच्यामध्ये काही कष्ट घेत आहेत का? असं नसेल तर मग ते नेते भविष्य असेल तिकडे जायला पाहातात. आम्ही २०१९ ते २०२२ विरोधी पक्षात होतो. या अडीच वर्षात आमच्यासोबतचा एकही आमदार गेला नाही. तेव्हा आम्हाला निधी मिळाला नाही. मी तर विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देतोय. आम्हाला तर काहीच मिळत नव्हता.

90 टक्के विरोधी लोकांना काहीना काही पैसे दिले- देवेंद्र फडणवीस 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बजेट मांडतो. बजेटमध्ये पीडब्लू विभाग जो आहे..विरोधी पक्षांच्या 90 टक्के लोकांना आम्ही काहीना काही पैसे दिले आहेत. कदाचित आमच्याकडील लोकांना जास्त मिळाले आहेत. सत्ताधारीही असतील ज्यांना कमी मिळाले असतील. कोणाचे प्रोजेक्ट असतात. यावरही अशा गोष्टी निर्भर असतात. एकूणच आपण बघितलं तर 2.5 वर्ष सातत्याने आम्ही आमच्या लोकांना घेऊन भांडत राहिलो. 15 वर्ष विरोधी पक्षात होतो. पण आमचे नेते मुंडे साहेब होते. मुंडे साहेबांचं व्यक्तीमत्व होतं. ते आमच्याशी ज्या प्रकारे वागायचे. त्यांचा सभागृहात प्रेझेंस होता. आम्हाला वाटायचो. आम्ही विरोधात असलो तरी आमच्या नेत्यात ताकद आहे. नेत्याने त्यांच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. तो आत्मविश्वास निर्माण होत नाही., त्यावेळेस पक्ष संपत असतो. निधी महत्त्वाचा आहे. पण तो सेकंडरी विषय आहे.

ऑपरेशन टायगरमध्ये फडणवीसांचा किती सहभाग होता? 

पहिल्यांदा तर अशा प्रकारचे ऑपरेशन (टायगर) होतात. त्यात काय घडलं? कसं केलं? या गोष्टी सांगायच्या नसतात.  आमच्या मित्र पक्षांनी ते ऑपरेशन केलं. त्यांना आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना जी आवश्यकता म्हणून आम्ही ती मदत त्यांना केली. याबाबत अधिक सांगणे सुज्ञ राजकारणी व्यक्तीला योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.