'नेता दोषी आढळून आल्यास त्याची कसलीही गय केली जाणार नाही,' देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना मोठा इशारा

ऋत्विक भालेकर

24 Mar 2026 (अपडेटेड: 24 Mar 2026, 06:09 PM)

Devendra fadnavis : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी तापासाची माहिती देण्यात आली. त्यांनी विधानसभेत उपस्थितांना निवेदन केलं आहे. या प्रकरणात कोणताही सरकारी अधिकारी किंवा राजकी. नेता दोषी आढळून आल्यास त्याची कसलीही गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. 

Devendra fadnavis

Devendra fadnavis

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चौकशी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची वडेट्टीवारांची मागणी

point

'कोणासोबत फोटो असणं हा गुन्हा नाही'

Devendra fadnavis : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी तापासाची माहिती देण्यात आली. त्यांनी विधानसभेत उपस्थितांना निवेदन देण्यात आलं आहे. 'या प्रकरणात कोणताही सरकारी अधिकारी किंवा राजकीय. नेता दोषी आढळून आल्यास त्याची कसलीही गय केली जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : '8 महिलांचे 35 व्हिडिओ, अशोक खरातने भोंदूगिरी करून महिलांवर केले बलात्कार', फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं

चौकशी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची वडेट्टीवारांची मागणी

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महिला अधिकाऱ्याने एसआयटी प्रमुख अशी नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात काही आयपीएस आणि महसूल अधिकारी गुंतून बसल्याचा संशय व्यक्त करत, ही चौकशी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी करण्यात आली. 

हे ही वाचा : '..,तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही', महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वेगाड्या रद्द करुन परप्रांतियांना प्राधान्य दिल्याने मनसेचा इशारा

'कोणासोबत फोटो असणं हा गुन्हा नाही'

दरम्यान, याचवर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणासोबत फोटो असणं हा गुन्हा नाही, मात्र खरातचा डिलिट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला असून, आर्थिक व्यवहार किंवा मदतीचे पुरावे मिळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, तसेच एसआयटी चौकशीत कायद्याप्रमाणे न्यायाधीशांच्या हस्तक्षेपाची तरदूत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.