संतोष देशमुख यांच्यानंतर तुझाच नंबर होता, जरांगेंच्या सहकाऱ्याला धमकी, मुंडेंच्या समर्थकाची कथित क्लीप व्हायरल

Beed News : संतोष देशमुख यांच्यानंतर तुझाच नंबर होता, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याला धमकी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाची कथित क्लीप व्हायरल

Beed News

Beed News

मुंबई तक

10 Nov 2025 (अपडेटेड: 10 Nov 2025, 12:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख यांच्यानंतर तुझाच नंबर होता, जरांगेंच्या सहकाऱ्याला धमकी

point

मुंडेंच्या समर्थकाची कथित क्लीप व्हायरल

रोहिदास हातागळे /बीड (दि.10) :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “संतोष देशमुख यांच्या नंतर तुझाच नंबर होता,” अशा शब्दांत काळकुटेंना थेट धमकी देण्यात आली असून, या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

धनंजय मुंडेंच्या समर्थकाची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल 

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने गंगाधर काळकुटेंना फोन करून ही धमकी दिली. या फोन कॉलची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, “मुंबई तक” या क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र, या ऑडिओ क्लीपमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे.

"संतोष भैय्यानंतर दुसरा नंबर तुझाच होता", कथित क्लीपमध्ये काय म्हटलं? 

ऑडिओ क्लिपमध्ये धमकी देणारा व्यक्ती स्वतःचं नाव “पैलवान सतीश” असं सांगतो आणि तो परळीतील धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याचा उल्लेख करतो. तो काळकुटेंना उद्देशून म्हणतो, “संतोष भैय्यानंतर दुसरा नंबर तुझाच होता. तुझ्यात दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात ये, एकटा ये.” यावेळी तो काळकुटे हे धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध करत आहेत आणि त्यांची बदनामी करतात, असा आरोप करतो.

हेही वाचा : गावातील तरुणाशी अनैतिक संबंध, संतापलेल्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, वर्ध्यातील घटना

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी कट रचण्यात आल्याचं समोर आलं होत. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक देखील केली होती. हा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. मात्र, धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

गंगाधर काळकुटे यांनी या धमकीनंतर आपला जीव धोक्यात असल्याची भावना व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींमुळे परळी आणि बीड परिसरातील राजकीय वातावरण तापलयं. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गटाकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या कथित धमकीच्या क्लिपमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा नवा मुद्दा निर्माण झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अजून मिळाली का नाही माझी पत्नी? सातत्याने पोलिसांना विचारणा केल्यानं दृश्यम स्टाईल कांड समोर आलं, पुण्यात खळबळ

    follow whatsapp