रुपाली चाकणकरांनी राजीनाम्याचं कारण काय दिलंय माहितीए?, 'ते' पत्र जसंच्या तसं...

Rupali Chakankar Resignation Letter: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिला आहे. पाहा या पत्रात त्यांनी राजीनाम्याचं नेमकं काय कारण दिलं आहे.

do you know reason rupali chakankar cited for her resignation see her resignation letter

रुपाली चाकणकरांचं राजीनामा पत्र (फाइल फोटो)

मुंबई तक

• 10:54 PM • 20 Mar 2026

follow google news

नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन खरात) याच्या बलात्कार व महिलांचा लैंगिक शोषण प्रकरणातून निर्माण झालेल्या तीव्र राजकीय व सामाजिक दबावानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. आज (20 मार्च) त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थान भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला.

हे वाचलं का?

रूपाली चाकणकर यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं...

दिनांक: 20/03/2026

प्रति, 
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री, 
महाराष्ट्र राज्य

विषय: अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्विकारणेबाबत 

मी. सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतश: ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. 

तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. 

धन्यवाद..!

आपली विश्वासू

सौ. रुपाली निलेश चाकणकर

  • प्रकरणाची पार्श्वभूमी

- 15 ऑक्टोबर 2024 रोजी रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावर नियुक्ती झाली होती.

- नाशिक क्राइम ब्रांचने अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त झाले. SIT चौकशी सुरू आहे.

- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडीओत चाकणकर यांनी खरात यांच्या पाद्यपूजा केल्याचे आणि विविध कार्यक्रमात एकत्र असल्याचे दिसते.

- खरात यांच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त होत्या.

हे ही वाचा>> NCP च्या आणखी एका नेत्याची विकेट, खरातची साथ सोबत भोवली... रुपाली चाकणकरांनी अखेर दिला राजीनामा

  • CM फडणवीसांनी दिले थेट राजीनाम्याचे आदेश

दरम्यान, वाढत राजकीय दबाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. ज्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा सुनेत्रा पवारांकडे सोपवला. मात्र, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाचा राजीनामा रुपाली चाकणकर देणार का किंवा सुनेत्रा पवार त्या पदाचाही राजीनामा मागणार का? असा सवाल विचारला जात आहे.

हे ही वाचा>> अशोक खरातच्या लैंगिक संबंधाच्या 58 Video Clips, 'ही' Inside Story तुम्हालाही टाकेल हादरवून

सोशल मीडियावर "महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतः अशा व्यक्तीच्या पायाला पाणी घालतात, मग महिलांच्या सुरक्षेची हमी कशी?" अशा स्वरुपाच्या टीका होत आहेत. हे प्रकरण अंधश्रद्धा, राजकीय नेत्यांचे भोंदू बाबांशी संबंध आणि महिला हक्क संस्थांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न उपस्थित करत आहे.
 

    follow whatsapp