‘शिंदे सरकार 15 दिवसात पडणार..’, संजय राऊतांच्या दाव्यामागची काय आहे कहाणी?

मुंबई तक

24 Apr 2023 (अपडेटेड: 24 Apr 2023, 11:38 AM)

संजय राऊतांच्या या 15 दिवसांच्या डेथवॉरंटमध्ये शिंदे-फडणवीस सरकार पडण्याच्या किंवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या किती शक्यता आहेत, हे जाणून घेऊयात.

eknath shide devendra fadnavis goverment collapse in 15 days

eknath shide devendra fadnavis goverment collapse in 15 days

follow google news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी येत्या 15 ते 20 दिवसांत शिंदे-फडणवीस कोसळणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेस संजय राऊतांनी अशाप्रकारे दावे केले आहेत, त्या त्या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात उलटफेर झाला आहे. याची उदाहरणे सांगायची झाली तर 2019 दरम्यान शिवसेनेची भाजपचा साथ सोडून कॉग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी. त्यामुळे आता संजय राऊतांच्या या 15 दिवसांच्या डेथवॉरंटमध्ये शिंदे-फडणवीस सरकार पडण्याच्या किंवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या किती शक्यता आहेत, हे जाणून घेऊयात.(eknath shide devendra fadnavis goverment collapse in 15 sanjay raut claim what was the true story)

हे वाचलं का?

“मी मागे एकदा सांगितलं होतं की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल. पण, न्यायालयाचा निकालच उशीरा लागतोय, पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा डेथवॉरंट लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही आणि कुणी करायची हे ठरलं आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. पुष्पचक्र अर्पण करा”, असं भाकित संजय राऊत (Sanjay raut) यांनी केलं. खरं तर सर्वोच्च न्यायालय येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर अंतिम निर्णय़ देणार आहे. य़ा अंतिम निर्णय़ात निकाल ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजून लागेल अशी संजय राऊतांना आशा आहे. त्यामुळेच त्यांनी डेथ वॉरंटच भाकित केले आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी: शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, जावयाकडे अदानी कंपन्यांचे तब्बल 45 हजार शेअर्स!

सर्वोच्च न्यायालयात हे निकाल येणार समोर…

  • जर सर्वोच्च न्यायालय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा जून 2022 दरम्यानचा आदेश रद्द करते, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना बहूमत सिद्ध करायला सांगितले होते. तर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.इतकेच नाही तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागेले आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील.ठाकरे गटाला (Thackerey Group) अरूणाचलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 2016 च्या निकालाशी आशा आहे.
  • सर्वोच्च न्यायालय जर राज्यपालांचा आदेश योग्य मानत असतील तर निकाल मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने लागेल. त्यामुळे राज्यात जे शिंदे-फडणावीस सरकार आहे, तेच कायम राहिल.
  • शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेला सामोर जावे लागेल का? दरम्यान अद्याप शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.
  • सर्वोच्च न्यायालय राज्यात दुसऱ्यांदा निवडणूक घेण्याचे आदेश देऊ शकते.

हे ही वाचा : संजय राऊतांचा निशाणा अजितदादांवर; प्रत्युत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांनी…

दरम्यान वरील पर्यायानुसार दोन्ही गटाला दिलासा अथवा झटका मिळणार आहे. आता यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp