Eknath Shinde : 'मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल', असं सुचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांनी 18 जानेवारी रोजी रविवारी मुंबईतील ताज लँड्स हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईचा महापौर कोण होणार या प्रश्नाचं उत्तर दिलं. याच पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी त्यांना आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले? असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, मला देखील त्यांना भेटायचं होतं आणि काही मार्गदर्शन करायचं होतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मालकिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, मित्रासोबत मिळून दोन महिने अत्याचार, 'असं' बाहेर आलं प्रकरण
शिंदे यांचे नगरसेवक नॉटरिचेबल
महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबईचा महापौर शिंदे यांच्या शिवसेनेचाच व्हावा अशी एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याच्या चर्चा वृत्तमाध्यमातून प्रसारीत होताना दिसत आहेत, अशा गंभीर स्थितीत त्यांचे काही नगरसेवक हे हॉटेलवर असल्याचं सांगण्यात येत आहे, तर काही नगरसेवक हे नॉटरिचेबल आहेत.
हे ही वाचा : शिंदे गट, कलानी अन् इदनानी एकत्र लढले; तरी ठरले अपयशी, उल्हासनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
'मुंबईचा महापौर हा...' काय म्हणाले एकनाथ शिंदे?
त्याचबरोबर ते म्हणाले की, 'शिवसेनेला कोणतंही गालबोट लागू नये, तुमच्या वागण्यावर आणि बोलवण्यावर लोकांचं लक्ष असतं. कोणालाही वाईट वाटू नये. लोकांना निवडून दिलेला प्रतिनिधी हा चांगलाच वाटावा, अशा काही सूचना दिल्या आहेत', असं ते म्हणाले आहेत. त्यानंतर महापौरपदाबाबत विचारलं असता, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की, 'मुंबई महापालिकेचा महापौर हा महायुतीचा होणार', असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT











