Nagar Parishad Election Result LIVE: बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Beed District Nagar Parishad Election Result: बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 5 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in beed district ambajogai beed georai majalgaon parli vaijnath nagar parishad election 2025 result

बीड जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 12:52 PM)

follow google news

बीड: बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, बीड, गेवराई, माजलगाव आणि परळी-वैजनाथ या 5 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

बीड जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल

  • बीड ब्रेक: बीड नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने खाते उघडले असून अमर नाईकवाडे विजय

परळी वैजनाथ न.प सार्वत्रिक निवडणूक – २०२५

  • पहिली फेरी 

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

पद्मश्री धर्माधिकारी घड्याळ - 2579
संध्या देशमुख तुतारी - 1229
पंजा - १०८०
घड्याळ लीड — १३५०

अंबाजोगाई तिसरी फेरी

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 
नंदकिशोर मुंदडा - 15044  bjp आघाडीवर
राजकिशोर मोदी - 13590 घड्याळ
Bjp आघाडी 1454 

  • गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपाचे नगरसेवक पदाचे तीन प्रभागांमध्ये सहा उमेदवार विजयी

  • प्रभाग क्रमांक १  अ) गंगूबाई बेंद्रे ब) राजेश टाक

  • प्रभाग क्रमान 2 - अ) प्रशांत राख ब) राधिका मडके 

  • प्रभाग क्रमांक 3  अ) ज्ञानेश्वर भाले 

  • बीड नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने खाते उघडले असून अमर नाईकवाडे विजयी
     
  • गेवराई नगरपालिका निवडणुकीत पहिला फेरीत भाजपा आघाडीवर, नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार विजयी

  • बीड नगर परिषद  निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांच्या पतीचा नगरसेवक पदासाठी पराभव 

  • माजलगाव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मेहरीना शिफा बिलाल चाऊस या 380 मतांनी आघाडीवर आहेत

  • माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल सरवदे विजयी.. प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद यादव  विजयी.
  • माजलगाव नगर पालिका निवडणूक प्रभाग २ मध्ये शेख इम्रान शे.बशीर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
  • बीड नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपाचे शुभम धूत व साखरे विजयी 
  • उज्वला सचिन जावळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) विजयी
  • बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये तुतारीचे दोन्ही उमेदवार विजयी..
  • जाधव बबीता सुधाकर - तुतारी
  • अशोक मारुती काळे- तुतारी
  • बीड नगरपरिषदेत भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँटे की टक्कर

  • भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले

  • बीड नगर परिषदेत दुसऱ्या फेरीत भाजपाच्या ज्योती घुंबरे आघाडीवर

  • अंबाजोगाई पहिली फेरी - नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी - 4577 घड्याळ पिछाडीवरनंदकिशोर मुंदडा - 4976 भाजप आघाडीवर

1. अंबाजोगाई

अंबाजोगाई नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • अंबाजोगाई तिसरी फेरी

    नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 
    नंदकिशोर मुंदडा - 15044  bjp आघाडीवर
    राजकिशोर मोदी - 13590 घड्याळ
    Bjp आघाडी 1454 

  • अंबाजोगाई पहिली फेरी - नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी - 4577 घड्याळ पिछाडीवरनंदकिशोर मुंदडा - 4976 भाजप आघाडीवर

 

----------------

अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

---

अंबाजोगाई नगर परिषदेसाठी एकूण 70 टक्के मतदान झालं

  • अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

लोकविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी 

'आम्ही अंबाजोगाईमध्ये स्थानिक समविचारी लोकांची आघाडी करून या ठिकाणी या निवडून तिला सामोरे जातो आहोत. आमचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित दादा पवार गट, समाजवादी पार्टी, मनसे, आरपीआय आठवले गट या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे.' 

'या सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही आघाडी तयार केली आहे. या ठिकाणी आमच्या आघाडीचे चिन्ह असणार आहे. यामुळे वेगवेगळे चिन्ह होऊ नये म्हणून आम्ही आघाडीचे चिन्ह घेणार.'

'गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही जो अंबाजोगाई शहराचा विकास केला आहे शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल सामाजिक एकोपा ठेवण्याचं काम आम्ही केलं आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे.'

'आज जे काय ते विकास सांगतात तो विकास रस्ते करून होत नाही. रस्त्याच्या माध्यमातून एकच गुत्तेदार पोसायचा त्यांची पार्टनरशिप सुद्धा आहे असं लोक म्हणतात आणि आज जे रस्ते केले आहेत ते लोकांना उपयोगाचे नाही रस्ते उंच झाले आणि घर खाली झाले. घरांमध्ये पाणी जाते गैरसोयीचे रस्ते आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी रस्ते केले आहेत.' 

'शहराचा महत्त्वाचा मुद्दा पाणीपुरवठा आहे. आमच्याकडे नगरपालिका असताना तीन ते चार दिवसाला आम्ही पाणी देत होतो आज दहा दिवसाला पाणी नाहीये दोन दोन तीन तीन महिने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नाहीये'

'स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि दिवाळीमध्ये रस्त्यावर भीक मागून आंदोलन करावा लागलं या पद्धतीचा चुकीचा कारभार आमदारांच्या माणसाचा आहे.'

'ते जे आरोप करतात त्याचा आम्ही खंडन केलं. पाच वर्ष ते माझ्यावर आरोप सिद्ध करू शकले नाही. त्यांच्यापेक्षा इथल्या स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमचा एकच मुद्दा आहे अंबाजोगाई शहराचा विकास.. पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकणार.'

2. बीड

बीड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • बीड नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने खाते उघडले असून अमर नाईकवाडे विजयी

  • बीड नगर परिषद  निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांच्या पतीचा नगरसेवक पदासाठी पराभव

  • बीड नगरपरिषदेत भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँटे की टक्कर

  • भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले

  • बीड नगर परिषदेत दुसऱ्या फेरीत भाजपाच्या ज्योती घुंबरे आघाडीवर

  • बीड नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपाचे शुभम धूत व साखरे विजयी 
  • उज्वला सचिन जावळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) विजयी
  • बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये तुतारीचे दोन्ही उमेदवार विजयी..
  • जाधव बबीता सुधाकर - तुतारी
  • अशोक मारुती काळे- तुतारी

--------

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

---

बीड नगर परिषदेसाठी एकूण 59 टक्के मतदान झालं

  • बीडच्या मतदान केंद्रांवरील बोगसगिरीवरून भाजप नेते योगेश क्षीरसागर आक्रमक

बीड शहरातील प्रभाग क्र. ६ मधील जुना बाजार भागातील जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रियेदरम्यान बोगसगिरी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मतदान केंद्राला भेट देत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. मतदान केंद्रात मोबाईल कसे काय आणले? असा सवाल करत ओळखपत्र पाहिल्याशिवाय एकाही मतदाराला मतदान करू देऊ नका, अन्यथा तक्रार करीन, असा दम डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिला आहे.

  • बीडमधील बूथ क्रमांक 6 वर ईव्हीएम मशीन पडली बंद

बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील बूथ क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 15 मधील ईव्हीएम मशीन 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा गोंधळ. ईव्हीएममध्ये एरर आल्याने बंद पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास सकाळपासून दोन ते तीन मशीन बदलले आहेत वारंवार प्रॉब्लेम होत आहे. 'मतदान आम्हाला व्यवस्थित करता येत नाही. लाईट गेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडत आहेत.' अशी तक्रार मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी बोलताना व्यक्त केली आहे.

  • बीड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

'मी रबरी शिक्का नाही स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम...' भाजप उमेदवार ज्योती घुंबरेंचा  निर्धार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बीड आणि परळीची निवडणूक महत्त्वाची आहे बीडच्या नगर परिषदेमध्ये गेल्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये क्षीरसागर यांनी कायम वर्चस्व ठेवले असून यावेळच्या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर यांना खिंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीचे सूत्र आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे देण्यात आले आहेत. 

मात्र योगेश क्षीरसागर यांनी थेट भाजपात प्रवेश करून डॉक्टर ज्योती घुंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुशिक्षित उमेदवार त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेला अनुभव यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा फायदा होईल. असं बोललं जात आहे. बीडच्या विकासासाठी महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्याच बरोबर शहरातील विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं भाजपाच्या उमेदवार डॉक्टर ज्योती घुंबरे यांनी सांगितले आहे.

3. गेवराई

गेवराई नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपाचे नगरसेवक पदाचे तीन प्रभागांमध्ये सहा उमेदवार विजयी

  • प्रभाग क्रमांक १  अ) गंगूबाई बेंद्रे ब) राजेश टाक

  • प्रभाग क्रमान 2 - अ) प्रशांत राख ब) राधिका मडके 

  • प्रभाग क्रमांक 3  अ) ज्ञानेश्वर भाले 

  • गेवराई नगरपालिका निवडणुकीत पहिला फेरीत भाजपा आघाडीवर, नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार विजयी

-----------

गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

---

गेवराई नगर परिषदेसाठी एकूण 73 टक्के मतदान झालं

  • राडा करणाऱ्याला तडीपार करण्यात येणार: पोलीस अधीक्षक नवनीत कावंत

गेवराईतील दगडफेकींमधील लोकांवर पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार
शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी कोणी जर हिंसात्मक प्रकार करत असतील तर तात्काळ पोलिसांसोबत संवाद साधा. 
सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींना शोधण्यात येणार. 
गेवराई मध्ये अधिक पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे वरिष्ठ अधिकारी ही नेमण्यात आले.
 

  • गेवराईमध्ये पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीमार

गेवराई आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने-सामने
गेवराई मतदानाला हिंसक वळण पवार, पंडित गटात दगडफेक.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त रस्त्यावर
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस रस्त्यावर 

  • गेवराईमध्ये पवार गट आणि पंडित गट आमने-सामने

गेवराईमध्ये पोलीस रस्त्यावर दोन्ही गटांना पांगविण्याचा प्रयत्न सुरू
जमावाकडून गाडीची तोडफोड काचाही फोडल्या. 
गेवराईमध्ये मतदानाला हिंसक वळण. 
माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक

  • गेवराई नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

4. माजलगाव

माजलगाव नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • माजलगाव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मेहरीना शिफा बिलाल चाऊस या 380 मतांनी आघाडीवर आहेत
  • माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल सरवदे विजयी.. प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद यादव  विजयी.

--------

माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

माजलगाव नगर परिषदेसाठी एकूण 76 टक्के मतदान झालं

  • माजलगाव नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

5. परळी-वैजनाथ

परळी-वैजनाथ नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

परळी वैजनाथ न.प सार्वत्रिक निवडणूक – २०२५

  • पहिली फेरी 

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

पद्मश्री धर्माधिकारी घड्याळ - 2579
संध्या देशमुख तुतारी - 1229
पंजा - १०८०
घड्याळ लीड — १३५०

----------------

परळी-वैजनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

परळी-वैजनाथ नगर परिषदेसाठी एकूण 65 टक्के मतदान झालं

  • परळीत मुंडे बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला

बीड जिल्ह्यात सहा नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया पार पाडत असून अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी परळी नगरपरिषद निवडणूक होय या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी देखील आज सकाळीच आपल्या कुटुंबासह आंबेवेस भागातील बाळ संस्कार केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचा मोठा आव्हान आहे.. आणि परळीकरांनी परळीच्या विकासासाठी मतदान करावं असं आवाहन देखील पद्मश्री धर्माधिकारी यांनी मतदारांना केलं.

  • परळी शहरांमध्ये एकूण मतदान 79,569 एकूण मतदान संख्या 
  • परळी शहरात एकूण मतदान केंद्र 88 
  • एकूण कर्मचारी संख्या 528 
  • झोनर 9 पोलीस अधिकारी 15 पोलीस कर्मचारी 100 होमगार्ड 125 एस आर पी फलटण 1 असा बंदोबस्त देण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही यासाठी प्रशासन सज्ज आहे.

 

  • परळी-वैजनाथ नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे दोन नगरसेवक बिनविरोध, राष्ट्रवादी (शरद पवार गट) धक्का

परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती भाजपा राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गटाने खाते उघडलं असून दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री गीते वार्ड क्रमांक 11 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रेश्मा केशव बळवंत यांची वार्ड क्रमांक 13 अ मधून बिनविरोध निवड झाली असून महायुतीने बीड जिल्ह्यामध्ये खाते उघडले आहे.

परळीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मुंडे बहीण-भाऊ एकत्र निवडणूक लढत आहेत त्यांना आता यामध्ये दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत यामुळे आता महायुतीमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला या ठिकाणी उमेदवार देता आला नाही यामुळे महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

मुंडे बहीण-भावांची परळीत पहिल्यांदाच युती 

परळी नगर परिषद निवडणूकीत तिरंगी लढत पाहायला मिळत असून या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांची पहिल्यांदा युती झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संध्या दीपक देशमुख, काँग्रेसकडून सय्यद मैमुना तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. 

'विरोधकांचे कोणतेही आव्हान मला वाटत नाही'

परळीच्या राजकीय वर्तुळातील तापमान वाढलं असून महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'परळीचा समृद्ध, स्वच्छ आणि डिजिटल विकास हा माझा मुख्य अजेंडा असून प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला आहे. मी रबरी शिक्का म्हणून राहणार नाही.. लोकहिताचे आणि विकासाचे निर्णय मी स्वतः घेणार आहे.. पती नगराध्यक्ष असताना पाहिलेला विकासाचा संकल्प पुढे नेत परळीकरांच्या सेवेसाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे आणि परळीकरांचा पाठिंबा असल्याने विरोधकांचे कोणतेही आव्हान मला वाटत नाही.' असे पद्मश्री धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

 

    follow whatsapp