Nagar Parishad Election Result LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Ratnagiri District Nagar Parishad Election Result: रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या चार नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live, chiplun district nagar parishad result, khed nagar parishad result, rajapur nagar parishad result, ratnagiri nagar parishad result, nagar parishad election 2025 result

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:37 PM)

follow google news

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरी या चार महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल

  • रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे 4 हजार 900 मतांनी आघाडीवर

  • रत्नागिरी- राजापूर शिवसेनेच्या श्रुती ताम्हनकर आघाडीवर, माजी आमदार हुस्नबानू खलिपे पिछाड़ीवर

    प्रभाग क्र - १ ब

    1. ओंकार विलास कुलकर्णी - उबाठा - 42
    2. निकेतन अनंत पाटणे - शिवसेना - 294

    प्रभाग क्र - 2 ब 

    1. अनिल वसंत मोरे - अपक्ष - 08
    2. रहीम युसुफ सहीबोले - भाजप - 157
    3. जिशान बशीर हमदुले - उबाठा - 159

    प्रभाग क्र - 3 ब 

     1. सुनील बाबुराव दरेकर - शिवसेना - 275
     2. चंद्रशेखर केरूशेठ पाटणे - उबाठा - 102

     प्रभाग क्र - 4 ब 

     1. तौसिफ अब्दुल कादीर खोत - शिवसेना - 265
     2. वाजूहिद्दीन महमूद परकार - राष्ट्रवादी - 88

    प्रभाग क्र - 5 ब 

     1. आरती महेंद्र पवार - शिवसेना - 312
     2. सुनीता सागर खालकर - उबाठा - 118
     

  • राजापूर - शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर आघाडीवर
  • चिपळूणमध्ये - उमेश सकपाळ(शिंदे शिवसेना)३५ मतांनी आघाडी
  • रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे ३ हजार मतांनी आघाडीवर
  • रत्नागिरी- शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे आघाडीवर
  • चिपळूण - NCP चे रमेश कदम आघाडीवर

-----------------

1. चिपळूण

चिपळूण नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • चिपळूणमध्ये - उमेश सकपाळ (शिंदे शिवसेना)३५ मतांनी आघाडी
  • चिपळूण - NCP चे रमेश कदम आघाडीवर

---------------

चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

चिपळूण नगर परिषदेसाठी एकूण 64 टक्के मतदान झालं

रत्नागिरी जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7: 30 वाजल्यापासून चिपळूण या ठिकाणीं मतदानाला सुरुवात झाली आहे.

  • चिपळूण नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

2. खेड

खेड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

खेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

खेड नगर परिषदेसाठी एकूण 63 टक्के मतदान झालं

रत्नागिरी जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7: 30 वाजल्यापासून खेडमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.

  • खेड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

3. राजापूर

राजापूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • राजापूर - शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर आघाडीवर

-----------------

राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

राजापूर नगर परिषदेसाठी एकूण 75 टक्के मतदान झालं

  • राजापूर नगर परिषदेतील मतदान केंद्र 5 मधील EVM मध्ये बिघाड

राजापूर नगर परिषद निवडणूक मतदान केंद्र नंबर 5 या केंद्रावरील evm मशीन दोन ते तीन वेळा बंद पडल्यामुळे 
मतदान काही काळ थांबले होते. परंतु निवडणूक अधिकारी यांनी तातडीने मशीन बदलून पुन्हा मतदान सुरळीत सुरू झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7: 30 वाजल्यापासून राजापूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.

  • राजापूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

4. रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे 4 हजार 900 मतांनी आघाडीवर

  • रत्नागिरी- राजापूर शिवसेनेच्या श्रुती ताम्हनकर आघाडीवर, माजी आमदार हुस्नबानू खलिपे पिछाड़ीवर

  • रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे ३ हजार मतांनी आघाडीवर
  • रत्नागिरी- शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे आघाडीवर

---------------

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

रत्नागिरी नगर परिषदेसाठी एकूण 55 टक्के मतदान झालं

  • रत्नागिरीमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह

तब्बल नऊ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर रत्नागिरी नगर परिषदेसाठी आज, २०२५ मध्ये सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथे असलेल्या सखी मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या केंद्रावर सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
निवडणुकीबद्दल लोकांमध्ये असलेली उत्सुकता स्पष्टपणे दिसत आहे. मतदान करण्यासाठी वयोवृद्ध नागरिक, महिला वर्ग आणि तरुणाई मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येताना दिसत आहेत.  

वयोवृद्ध नागरिक मोठ्या उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय असून, अनेक महिला सकाळच्या वेळीच मतदान केंद्रावर आल्यामुळे 'सखी मतदान केंद्रा'वर विशेष लगबग दिसून आली. रत्नागिरी नगर परिषदेची ही निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्यामुळे मतदारांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आणि उत्साह संचारला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाल्याने मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे स्थानिक समस्या आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित करून योग्य उमेदवाराची निवड करण्याची संधी मतदारांना मिळाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून रत्नागिरी शहराचा पुढील विकास मार्ग निश्चित होणार असल्याने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्यात दोन तासातील टक्केवारी 18% मतदान

रत्नागिरी जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7: 30 वाजल्यापासून रत्नागिरीमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.

    follow whatsapp