पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया समोर

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाची तारीख न्यायालयाने पुढे ढकलली आहे. येत्या 20 जून रोजी यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pawanraje Nimbalkar Murder Case

Pawanraje Nimbalkar Murder Case

मुंबई तक

16 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 12:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला

point

आता ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया समोर

Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज (16 जून) जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र न्यायालयाने आता निकालाची तारीख पुढे ढकलली असून येत्या 20 जून रोजी यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावना व्यक्त केल्या. "गेली 20 वर्षे आणि 13 दिवस आम्ही अत्यंत धैर्याने या निकालाची प्रतीक्षा करत आहोत. संविधानाच्या आणि न्यायाच्या मार्गाने आमची ही कायदेशीर लढाई सुरू आहे. आज न्यायालयाने निकालासाठी तारीख दिली होती, परंतु काही कमतरता पूर्ण करण्यासाठी आता 20 जून ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांनी गेली दोन दशके अविरत संघर्ष केला असून, न्यायालयाकडून आम्हाला पूर्ण न्याय मिळेल, अशीच आमची अपेक्षा आहे," असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

हे वाचलं का?

सामान्य माणसासाठी न्याय मिळवणे कठीण आणि दुरापास्त

या प्रदीर्घ कायदेशीर लढाईवर बोलताना ओमराजे म्हणाले की, 'मला आपल्यासा एवढंच सांगायचंय की, सामान्य माणसाला न्यायासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. माझी क्षमता होती म्हणून हायकोर्टात मी रिट दाखल करु शकलो. त्याच्या आधारे ही केस सीबीआयकडे गेली. त्यानंतरच सीबीआयच्या माध्यमातून पुढील तपास झाला आणि सगळे आरोपी त्याठिकाणी समोर आले. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय घेणं कठीण आणि दुरापास्त आहे. हे आरोपी समोर आल्यानंतरसुद्धा तब्बल वीस वर्ष अविरतपणे ह्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. जे आरोपी आहेत ते सारखं हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात गेले. सामान्य माणूस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील वकिलाची फी कशा पद्धतीने देऊ शकेल? वकील कशापद्धतीने अपॉईंट करेल. माझी क्षमता होती, आम्ही लढत गेलो.'

हे ही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल, ओमराजेंच्या पोस्टने वेधलं लक्ष

राजकीय वैमनस्यातूनच वडिलांची हत्या

आपल्या वडिलांच्या हत्येमागील मुख्य कारणाचा खुलासा करताना ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की,  'माझा राजकारणातला जन्मच त्यामुळं आहे. कशासाठी संपवलं राजेसाहेबांना याचं कारणच फक्त पॉलिटिकल होतं. कारण 2004 ची विधानसभा. ज्या निवडणुकीत माझे वडील अपक्ष उमेदवार असताना केवळ 484 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आणि तेही केव्हा जेव्हा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिला अशा आशयाचं खोटं वर्तमानपत्र मतदानादिवशी छापून..इतका प्रयत्न करुनही 484 मतांनी विजय त्यांना मिळाला होता. आणि तेच सलत होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको, त्यातूनच ही हत्या करण्यात आली. यासंदर्भात आम्हाला इतकीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा.'

हे ही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पद्मसिंह यांच्या वकिलाचा 1250 पानांचा लेखी युक्तिवाद, काय म्हटलं होतं?

'...राजकीय विरोधक संपत नसतो'

यापुढं बोलताना ओमराजे म्हणाले की, 'मला दाखवून द्यायचं होतं की, एखाद्या माणसाचा खून केल्यानंतर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो. तो विरोधक त्याठिकाणी तयार होत असतो. त्याच जिद्दीने मला इथेपर्यंत पोहोचवलं. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जी जनता आहे त्या सगळ्यांनी तळहातातल्या फोडाप्रमाणे इथंपर्यंत मला पोहोचवलंय, माझ्यापाठीमागे उभे राहिलेत. या हत्येचा निकाल आमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. निश्चितपणे अपेक्षा आहे की न्यायदेवता न्याय करेल.'