बीड: 'जे गॅजेट लोकशाही प्रस्थापित होण्याआधीचं होतं ते लागू करणं कितपत योग्य?', असं विधान भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. पण त्यांच्या याच विधानावरून मोठी खळबळ माजली आहे. कारण पंकजा मुंडेंच्या या विधानावर मनोज जरांगे यांचा पारा बराच चढला आहे. आज (2 ऑक्टोबर) मराठा समाजाच्या वतीने बीडमधील नारायणगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथेच मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. 'तुम्ही म्हणता आमचं गुलामीचं गॅजेट.. बरं मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का?' असं म्हणत मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
नारायण गडावरून बोलताना मनोज जरांगे संतापले, पाहा काय म्हणालेले
'सगळे बसलेत त्यांचे.. आपल्या घालतात दारात येडे.. पण चूक तुमची आहे. तुमच्या डोक्यातील दया-माया ज्यातच नाही. तुमच्या डोक्यात किडे पडलेत किडे.. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला तर मरेपर्यंत त्याला झटका दाखवायचा. त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद!'
'त्याला वाटतं की, संग तर हिंडतय हे #%$&@ पण इतके माझ्या जवळचे लोकं फोडून याने मला पाडलं कसं काय? तुम्हाला कडवट बनावं लागेल.'
हे ही वाचा>> कुणबी दाखले दिलेल्यांची संख्या मोजा, वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकर काय काय म्हणाले?
'एक उदाहरण सांगतोय.. हे काय करतात की, निवडणुकीच्या आधी आपल्याला थोडं डिवचतात आणि मग मी तिकडून उत्तर देतो. मी उत्तर दिलं की, 3 ते 4 महिने गप्प बसतात. त्याचा अर्थ समजून घ्या. ढिले नका म्हणू त्याला..'
'गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकडं, अवलादी..'
'ते तिकडून असा एक शब्द आपल्या काळजाला लागेल असा बोलतात की.. जसं की, गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकडं, अवलादी.. ज्या भिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं. आणि 3-4 महिने गप्प बसायचं.'
'ते एकटंच नाही.. असे जे-जे बोलतात त्यांच्याबद्दल सांगतोय. तुम्ही ना डोक्यात किडे पडलेत ते जाळून टाका.'
'आमचं गुलामीचं गॅजेट.. बरं मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट आहे. त्यांना तोडीला मी बोललो का? कोणाला बोट लावायचं गरज आहे का? मी बोट सुरू केल्यावर.. त्यासाठी लोकाच्या लेकरा-बाळाला तुच्छ लेखायचं नाही.'
हे ही वाचा>> पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्यात वाल्मिक कराडच्या पोस्टरबाजीची चर्चा, पोस्टरवरील आशयाने वेधलं लक्ष
'गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं. म्हणजे गॅजेट गुलामाचं होतं, तर आपले लेकरं सुद्धा गुलाम समजता का ओ *$&$^# का रे आमचे?'
'जे-जे त्या पक्षात काम करतात, तिच्या पक्षात काम करत्यात.. त्या मराठ्याच्या पैदाशी कोण-कोण आहेत? ऐ मराठ्यांनो तुमची खास पैदास आहे ना.. तर तुमच्या पोराला, तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हटलंय.. आता करतो का प्रचार &%^$$E?' असं म्हणत जरांगेंनी प्रचंड संताप व्यक्त केला.
'आमचं गुलामीचं गॅझेट हे निझामचं, ठीक.. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता?'
'अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कुठवर चाटतो रे... स्वाभिमान जागा ठेव रे.. तुझ्या जातीला घाण बोललं गेलं, घाण.. जे-जे त्या पक्षात तिच्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय.. मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हटलंय, गुलाम..'
'आपली जर गुलामीची पैदास आहे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथे कशाला $%@%^ काम करता का? तुमचा स्वाभिमान जागा होऊ द्या ना.. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात.. अस्सल अवलाद असाल तर कशाला कुणाच्या पायाखाली काम करता, पाय चाटून?'
'आता त्यांनी काय सांगितलं की, हे गुलामीचं गॅझेट कशाला लागू करता? आमचं गुलामीचं गॅझेट हे निझामचं, ठीक.. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता? का घरात राहत होता? निझाम आमच्या परिवारातील नाही म्हणून गुलाम.. मग इंग्रज हा तुमच्या परिवारातला आहे का? म्हणून 1931 ची जनगणना घेतली आणि त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं?'
'तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलंय, इंग्रजाच्या जनगणनेनं.. मग तुम्ही कोण? असा आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही.. आपण तुमच्यासारख्या बिघडलेल्या रक्ताचे नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणाले.. पण आम्ही विचारलं म्हणायचं का?' असा बोचरा सवाल विचारत जरांगेंनी मंत्री पंकजा मुंडेंना प्रतिसवाल यावेळी केला आहे.
'जे मराठ्याचे तिकडून उभे राहतील त्यांना खपाखप पाडायचे'
'ऐ... भीत वैगरे नाही हा.. शहाणपणा शिकवायचा नाही. गप बसलो म्हणून गप्प आहोत.. तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्यादिवशी कळेल. काही बोलता.. माजारडलेले नीट करायची ताकद आमच्यात आहे. काही बोलता?'
'अरे बाई लय बोलता येतं सगळ्याला.. मापात राहा.. याच्यासाठी $%#%# तुम्हाला 30 वर्ष मराठ्यांनी निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं का? की तुम्ही आमच्या अवलादीचे पाणउतारे करावे?'
'आता हे काय करणार ते सांगतो मी तुम्हाला. ते म्हणाले निजामाचं गॅजेट आहे.. ते म्हणाले गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं इंग्रजाचं आहे तेव्हा सुद्धा गुलामीच होती. तेव्हा कुठे स्वातंत्र्य होतं..'
'आता तेवढा काळजावर बाण हाणला हा आपल्या. हे काय करतात. हळूच जिव्हारी वार करत्यात आपल्या. आणि 2-3 महिने गप्प बसतात. आपल्या लोकांना काय वाटतं. जाऊ दे रे.. चुकला असेल काय होतं बोलताना आता नाही बोलणार इथून पुढे. अरे हे बदलणारच नाहीत.'
'त्यामुळे दयामाया कमी करा. जे मराठ्याचे तिकडून उभे राहतील त्यांना खपाखप पाडायचे. तेव्हा या आपल्या जाती पण नीट राहतील. आपले पण नीट वागतील, हुजरेगिरी करायचे बंद करतील. जेव्हा आपण पाडायला सुरु करू ना तेव्हा ते मराठ्यासोबत नीट वागायला सुरुवात करतील. कळाला का डाव?'
'ते आपल्या लेकरा-बाळाला डायरेक्ट म्हणाल्या.. गुलाम म्हटलं गेलं. तुम्हाला लेकराबाळा पेक्षा ते मोठे आहेत का? ते मीडियात जाहीर बोलतात आणि लोकांमध्ये बोलतात चुकलं बरं का.. इथून पुढे नाही बोलणार.' असं जरांगे यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडेंचं हेच 'ते' विधान जे जरांगेच्या जिव्हारी लागलं
'आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी, हुकूमशाहीतून बाहेर निघण्यासाठी.. लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत. जे गॅजेट लोकशाही प्रस्थापित होण्याआधीचे होते त्या गॅजेटचा आता अवलंब करावा हे कितपत योग्य आहे?'
'बरं आलं तर एका समाजाला हवंय आणि दुसऱ्याला नाही असं करता येत नाही. परंतु एससी आणि एसटीचा विषय हा राज्याच्या अखत्यारित नाही. हे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत. हे कोणी तरी सांगणारं, समजवणारं.. लोकांच्या मनातील संभ्रम दूर करणारं माणूस आहे का आता कोणी? नाही.. संभ्रम वाढवायचे, भांडणं लावायचे.. अशी परिस्थिती झाली आहे.' असं विधान पंकजा मुंडे यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. ज्यावरून आजच्या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंनी टीकास्त्र सोडलं आहे.
ADVERTISEMENT
