Sangli Politics : "इथून पुढे आपल्याला अरे म्हणणाऱ्याला कारे करण्याची आपली तयारी पाहिजे. जयंत पाटील यांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करण्याची भाजपच्या पाच नेत्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी लावा, लॉटरी घोटाळ्याची चौकशी करा, सर्वोदय कारखान्याचे चौकशी करा वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला हलक्यात घेऊ नका", असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना दिला आहे. सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या इशारा सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपकडून इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी लोकनेते राजारामबापू पाटील, लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, जनसुराज युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ज्येष्ठ नेत्या श्रीमती नीता केळकर, पृथ्वीराज पवार यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला, धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं
चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील भाजपमध्ये येणार नाहीत, पण आले तर त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागे बसावे लागेल. कारण गोपीचंद सिनियर आहेत. त्यांना 'गोपीचंद तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशाही घोषणा द्याव्या लागतील. त्यामुळे ते आता भाजपमध्ये येणार नाहीत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार सदाभाऊ खोत इशारा सभेत बोलताना म्हणाले, जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील इतर नेत्यांचे साखर कारखाने ढापले आहेत. जतचा साखर कारखाना, कवठे महांकाळचा साखर कारखानाही त्यांनीच घशात घातलाय. तर राजाराम बापूंचे सहकारी असणाऱ्या संभाजी पवारांचा सर्वोदय साखर कारखानाही असाच ढापलाय. संभाजी अप्पांचा तळतळाट जयंत पाटलांना नक्कीच लागेल. तुम्ही फक्त मला व गोपीचंदला मोकळे सोडा म्हणजे आम्ही राष्ट्रवादी नेत्यांना सरळ करू. आम्हाला आईबहिणीवरून शिव्या घालण्यासाठी सांगलीत संस्कृती बचाव मोर्चा काढला होता का? असा सवालही सदाभाऊंनी यावेळी विचारला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी कलम 88 अंतर्गत करावी अशी, मागणीही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात काय? लॉटरीचा घोटाळा कोण केल?, कारखाने कोण लाटले? मटके, दारूवाले, अवैध धंदेवाले सोडले तर तुमच्या सोबत आता राहिले कोण? गोपीचंद पडळकर यांनी कालच दसरा मेळावा घेऊन जिल्ह्यातील खऱ्या रावणाचे दहन केले, गंभीर टीका भाजपा नेते दिलीप कांबळे यांनी यावेळी केली.
हेही वाचा : मोठी बातमी: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार पुन्हा बैठकीसाठी एकत्र! नेमक्या कोणत्या विषयावर झाली चर्चा?
ADVERTISEMENT
