Shivsena dussehra melava : राज्यात महापालिका निवडणुकीची तारीख अद्यापही समोर आली नाही तरीही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच दसरा मेळाव्याची देखील जोरदार चर्चा होताना दिसते. शिवसेना पक्ष फुटण्यापूर्वी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाचा पारंपारिक दसरा मेळावा घेतला जात होता. पण, पक्षफुटीनंतर आता शिवसेनेचे दोन दसरा मेळावे घेतले जातात. एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा तर, दुसरा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा घेतला जाणार आहे. या दसरा मेळाव्यांपैकी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आई गरबा बघायला गेली, घरात बापानेच लेकीवर केला अत्याचार, तीव्र वेदना होऊ लागल्याने... अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा
शिवसेनेचा हा दसरा मेळावा आझाद मैदानावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याचं औचित्य साधून घेतला जाणार आहे. याचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो. हा ट्रेलर एआयमध्ये बनवण्यात आल्याचं दिसून येतंय. त्या ट्रेलरला आवाजही देण्यात आला आहे.
नेमकं काय आहे ट्रेलरमध्ये?
ट्रेलरमध्ये एक वाघ दिसतोय, त्या वाघाच्या डोळ्यात अंगार दिसत असून धगधगत्या आगीचं चित्र दिसून येतंय. त्यानंतर धनुष्यबाणाचं चित्र दिसतंय. या एकूण व्हिडिओत व्हाईसओव्हरचा वापर करण्यात आला आहे. "लांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ अन् जळून झाले खाक, अशी शिव सैनिकांची आग, खेचून आणलाय धनुष्य बाणाचा मान, उंच होती आणि उंच राहिल भगव्याची शान, ( त्याचक्षणी छत्रपती शिवाजी महाराज हे मध्यभागी दिसतात, तर एका बाजूला स्वर्गीय शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि नेते आनंद दिघे एका कोपऱ्यात दिसतात.)
भगवे विचार आणि भगवंच रक्त...,'
पुढे याच ट्रेलरमध्ये भगव्या ध्वजावर एकनाथ शिंदेंचा फोटो दिसत असून व्हिडिओत आवाज ऐकू येतो 'हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती,लाचारांचा दंगा नको शिवसैनिक नावाच्या वाघाशी', तेव्हा व्हिडिओच्या शेवटी एकनाथ शिंदेंचा फोटो दिसतो. तसेच त्यांच्या फोटोच्या एका बाजूला 'सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, भगवे विचार आणि भगवंच रक्त...,' असा आशय लिहिण्यात आला आहे.
हे ही वाचा : डोंबिवली: भंडाऱ्यात जेवला, हात धुवायला गेला आणि 13 वर्षाचा आयुष गमावून बसला जीव.. असं घडलं तरी काय?
दरम्यान, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर घेण्यात येणार आहे. पण याच मेळाव्यासाठी भाजपने दसरा मेळावा घेऊ नये असे सांगितले, तसेच दसरा मेळाव्याला खर्च केला जाईल ते पैसे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना द्यावेत, असा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सल्ला दिला. यामुळे या पारंपारिक दसरा मेळाव्यालाही राजकीय रंग लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
