Sangli : "कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा दाखला ज्यांना देण्यात आलाय, त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा. आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, असं मराठा समाजातील नेत्यांचं सुद्धा मत आहे. आमच्या पोराबाळांसाठी शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण हवं आहे, असं ते म्हणतात. आम्ही त्याला विरोध करत नाही. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा. एनटी ब आणि एनटी क आहे. तसं मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा वेगळा प्रवर्ग करा. ज्यांना दाखले दिले आहेत, त्यांची संख्या मोजा. त्यांना नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण द्या", असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. सांगलीच्या आरेवाडीत हिंदू बहुजनांच्या दसऱ्या मेळाव्या ते बोलत होते.
ADVERTISEMENT
"धनगरांच्या पोराच्या हातात एसटीचा दाखला पडला पाहिजे"
गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबतीत गंभीर विषय सुरु आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची संघर्षमय प्रक्रिया सुरु आहे. गेल्या 50-60 वर्षांपासून धनगर समाज एसटीचा दाखला मिळावा, यासाठी झगडतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. धनगरांच्या पोराच्या हातात एसटीचा दाखला पडला पाहिजे. ही आमची सरकारकडे मागणी आहे. धनगर समाजाबाबत गोपीचंद पडळकरची जी भूमिका काल होती, तीच भूमिका आज देखील आहे. जेव्हा धनगर आरक्षणाचा विषय असेल तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही. मी धनगर समाजाच्या बाजूने असेल. जेव्हा देवाभाऊंचा विरोधात जातीवादी लोक असतील, तेव्हा गोपीचंद पडळकर बाजीप्रभूंची भूमिका घेईल.
हेही वाचा : कोल्हापूर : तृतीयपंथीयासोबत अनैतिक संबंध, बायकोला समजताच मोठा वाद, नवऱ्याने डोळ्यात चटणी टाकून..
कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले ते लोकांना सांगा, पडळकरांची टीका
मला मंगळसूत्र म्हणता तर जयंत पाटील तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले ते लोकांना सांगा, असं म्हणत पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा खालच्या पातळीवर टीका केली. सांगलीत नुकतीच महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळव्याचे एक नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली होती. त्याला उत्तर देताना आज गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडली. गोपीचंद पडळकर यांनी दिलीप पाटलांचा उल्लेख वाळव्याचं कुत्र असा केला.
हेही वाचा : कोकणात पावसाची स्थिती स्थिर, तर मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांत अजूनही पावसाचा अंदाज
"तुम्ही डरपोक आहात. तुम्ही जातीवंत पाटील असाल तर मला शोधण्यापेक्षा उद्या मुंबई किंवा सांगलीत प्रेस घ्या.. मला दिनांक, वार, वेळ आणि टायमिंग कळवा मीच वाळव्यात किंवा ईश्वरपूर मध्ये येतो, असे आव्हान आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरेवाडीच्या बिरोबा बनात आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात केले आहे. पडळकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊन जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका करु नये, असं सांगितलं होतं. मात्र, यावेळी देखील त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.
ADVERTISEMENT
