Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला भरघोस मतं मिळाली होती. पण, राज्य सरकारने राबविलेल्या या योजनेचा अनेक गैर लाभार्थ्यांनी फायदा घेतलेला दिसून आला होता. आता याचपार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर मोहीम सुरु केली आहे. या बोगस लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. अशातच आता याच लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला दिसून येत आहे. काही बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा नियम लागू केलाय. लाभार्थी महिलांना पतीचं तसेच मुलींना वडिलांचे ई केवायसी जोडण बंधनकारक असणार असल्याचा राज्य सरकारने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात, रिक्षांना धडक देत 3 जण गंभीर जखमी, अपघातादरम्यान ती...
लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्य्यांसोबत त्या महिलेचे पती किंवा वडिलांच्या वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही आता राज्य सरकार पडताळणी करणार आहे. अशातच जर विवाहितेच्या पतीचं किंवा वडिलांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख असेल तर अशा महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा नवीन नियम सांगतो.
सरकार एकूण कौटुंबिक उत्पन्न तपासणार आहेत, आणि जे पात्र आहेत त्यांनाच त्याचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी लाभार्थी महिलांचे उत्पन्न शोधण्याचे काम सुरु होते. मात्र, त्यात गृहिणी आणि बहुतांश महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आढळले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी बंधनकारक केलेय.
असा भरा फॉर्म :
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
नंतर e-KYC वर क्लिक करून e KYC उघडलं जाईल.
e KYC मध्ये लाभार्थ्याने आधार क्रमांक आणि Captcha Code नमूद करावं आणि नंतर सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा. नंतर आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा आणि सबमिटवर क्लिक करावं.
KYC पूर्ण झाली आहे की नाही हे स्वत:हून तपासलं जाईल. जर KYC पूर्ण झाली असेल तर त्या ठिकाणी दिसून येईल.
नंतर आधार क्रमांक यादीत असेल, तर पुढे जा.
पुढे वडील किंवा पतीचा आधार क्रमांक तसेच पडताळणी Captcha Code नमूद करून संमती दर्शवा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करावं. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर टाकून सबमिटवर क्लिक करावं.
नंतर पुढे जात प्रवर्ग निवडावी, असे सांगण्यात येतंय.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यात 'या' तारखेला निर्माण होणार विष योग, काही राशीतील लोक येणार अडचणीत, नेमकं करावं काय? वाचा
तसेच कुटुंबातील सदस्य/कर्मचारी शासकीय विभाग/ उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही.
कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला योजनेचा लाभ घेतात. या एकूण बाबी तपासून चेक बॉक्सवनर क्लिक करून Submit वर क्लिक करावं आणि नंतर एकूण प्रक्रिया पूर्ण झाली असेल.
ADVERTISEMENT
