uddhav thackeray dasara melava teaser : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टीझरनंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने एकनाथ शिंदेंना चांगलंच डिवचल्याचं दिसून येत आहे. या टीझरमध्ये स्वर्गीय नेते आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाने टीझर सुरु होतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची आणखी एक मोठी अट, सविस्तर माहिती एका क्लिकवर
शिवसेना फुटीआधी एकच दसरा मेळावा साजरा केला जात होता. पण, शिवसेना पक्षफुटीनंतर दोन गट निर्माण झाले आणि आता मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा असे दोन मेळावे मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या टीझरची एकच चर्चा होताना दिसते.
नेमकं टीझरमध्ये काय दिसते?
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा दसऱ्याच्या निमित्ताने 2 ऑक्टोंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. अशातच दसरा मेळाव्याचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये 'शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची', अशा आशयाने टीझरची सुरुवात होते.
त्यानंतर शिवसेनेचे स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरेंचं भाषण सुरू होतानाचा आवाज ऐकू येतो 'तमाम माझ्या हिंदु बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो...' त्यानंतर 'महाराष्ट्र रक्षणाच्या शपथेची' अशा आशयाचं नाव दिसून येते. याचदरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचं वाक्य ऐकू येतं, 'जीवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र कोणाला देणार नाही स्वाभिमानी महाराष्ट्रप्रेमी म्हणून शपथ घेतो की 106 हुतात्म्याच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र लुटारून आणि दरोडेखोरांच्या हाती कधीही जावू देणार नाही', असे अंगावर शहारे आणणाऱ्या भाषणातील या शपथेनंतर 'नव्या दमाच्या नव्या दमाच्या ठिणगीची', असा आशय टीझरमध्ये दिसतो.
हे ही वाचा : गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात, रिक्षांना धडक देत 3 जण गंभीर जखमी, अपघातादरम्यान ती...
आदित्य ठाकरेंनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
यानंतर, वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे हे या टीझरमध्ये दिसतात, तेव्हा त्यांनी टीझरमधून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देणारा क्षण बोलून दाखवताना दिसतात. आदित्य ठाकरे म्हणतात की, 'माझ्या आजोबांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेची स्थापना केली होती. हातात तलवार तर दिलीच पण त्या बरोबर ताकदही दिली', त्यानंतर ही 'साक्ष अनुभवण्यासाठी या' असा आशय त्या एकूण ट्रेलरमध्ये दिसून येतोय. ट्रेलर संपल्यानंतर विचार ठाकरेंचा आणि विश्वास महाराष्ट्राचा असं मोठ्या ठळक अक्षरात नावाचा आशय दिसतो. सध्या या दसऱ्या मेळाव्याचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय.
ADVERTISEMENT
