Rohit Patil on Gopichand Padalkar, सांगली : भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील हे राजारामबापूंची औलाद वाटत नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पडळकरांना प्रत्युत्तर देण्यासाठी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभाही घेण्यात आली होती. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकरांना समज दिली होती.
ADVERTISEMENT
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांबाबत बोलताना जीभ घसरली. तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलंय, हे जनतेला सांग, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे तासगाव-कवठे महंकाळचे आमदार रोहित पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना चांगलंच सुनावलंय. रोहित पाटील पडळकरांना प्रत्यु्त्तर देताना काय म्हणाले? जाणून घेऊयात..
खालच्या पातळीवरील टीकेमुळे लोकांची करमणूक होते
खालच्या पातळीवर जाऊन टिका करणे, सभेमध्ये टाळ्या मिळवणे हेच सध्या केलं जातंय. लोक सभा संपली की ते विसरून जातात. गोपीचंद पडळकर यांच्या खालच्या पातळीवरील टीकेमुळे लोकांची करमणूक होते, पण त्यामुळे त्यांचे पोट भरत नाही. लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन उभे राहा. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम होत असेल, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल तर येत्या काळातील निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता याला उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले आहेत.
राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी. संपूर्ण कर्जमाफी द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. सक्तीने कर्जवसुली थांबवावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी तासगाव तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जनता निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, जिल्ह्यात एवढी अतिवृष्टी झाली त्याची पाहणी करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील फिरकलेही नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षांना इशारा सभा घेण्यात त्यांना स्वारस्य आहे. परिस्थिती इतकी बिकट असताना शेतकऱ्यांच्या मदतीला उतरणे गरजेचे असताना त्यांना इशारा सभा घेण्यात रस आहे. येत्या सगळ्या निवडणुकांत लोकं यांना त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही रोहित पाटील यांनी दिला.
ADVERTISEMENT
