Sushma Andhare on Devendra Fadnavis, Nagpur : राज्यातील पूरग्रस्तांना कोणतीही मदत मिळत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पलंग बसवण्यासाठी तब्बल 21 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. भाजप हा स्वतः मोठा पक्ष नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांनी भाजपमध्ये घेतलंय. भाजप भाडोत्री पक्ष उभा केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
महायुतीतील नेते पूरग्रस्त भागाला राजकीय पर्यटनासाठी जातात - अंधारे
"एका बाजूला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करत आहेत, परंतु फडणवीसांकडे त्यांच्यासाठी निधी उपलब्ध नाही. मात्र, वर्षा बंगल्यावर पलंग उभारण्यासाठी 21 लाखांची निविदा जाहीर केली जाते. शिवाय महायुतीतील इतर नेते पूरग्रस्त भागाला केवळ राजकीय पर्यटनासाठी भेट देत आहेत," असंही सुषमा अंधारे या वेळी बोलताना म्हणाल्या.
हेही वाचा : लोकसभेला उभे राहिले, गावाने लीड अन् निधी दिला; पण नंतर कधी फिरकलेच नाहीत, सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी अडवलं
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंच्या म्हणजेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला लक्ष केलं आहे. दसरा मेळावा रद्द करुन तो पैसा पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी द्यावा, असं म्हणत भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे. शिवाय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा, असा टोला लगावला होता. भाजपच्या या टीकेलाही सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे काय म्हणाल्या? जाणून घेऊयात..
चंद्रकांत पाटलांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यासंबंधी कल्पना मांडली आहे. निश्चितपणे त्यांच्या कल्पनेचा विचार करता येईल. मात्र त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना चंद्रकांत दादा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेणे अपेक्षित आहेत. श्री मोहन भागवत जी यांचा सशस्त्र पथसंचलना सहित असणारा दसरा मेळावा रद्द करण्याची त्यांनी घोषणा केली की आम्हाला सुद्धा भूमिका मांडणे सोपे जाईल.
ADVERTISEMENT
