Vijay Thelapathy : तमिळ सिनेसृष्टीतील थलापती विजय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोसेफ विजय चंद्रशेखर आता अभिनायासोबतच एक मोठा राजकीय नेता म्हणून नावारुपाला आला आहे, गेल्या वर्षी त्याने तमिलगा वेत्री कझगम हा स्वत:चा पक्षा स्थापन केला आणि त्या पक्षाचे अध्यक्षपदही भूषविले होते. विजय हा नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आता तो एका रॅलीमुळे चर्चेत आला असून त्याच्या रॅलीत काहींचा मृत्यू झाल्याने मन त्याचंही मन हेलावून निघालं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...
39 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू
विजय हा तमिळ सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार आहे. लोक त्याच्या चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहू बघत असतात. त्याने नुकतीच एक रॅली काढली त्या रॅलीला खऱ्या अर्थाने लोकांचा तुटूंब जनसागर लोटल्याचं बघायला मिळालं. याच एकूण रॅलीत लोकांची मोठी दैनी अवस्था निर्माण झाली होती. रॅलीत तब्बल 39 जण चेंगराचेंगरीत मृत्यू पावले असून काही लोक गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. या एकूण घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच आता विजय थलापतीने आपलं मौन सोडत सोशल मीडियावर पोस्ट करत हळहळ व्यक्त केली.
दुर्घटनेनंतर विजय थेलापती यांनी सोशल मीडियावर पोस्ट
या दुर्घटनेनंतर विजय थलापती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मौन सोडलं, त्यांनी अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली आणि त्यात लिहिले की, खूप दु:ख झालं. मी ज्या वेदना आणि दुख:द घटनेचा अनुभव घेत असून माझ्या समजण्याच्या पलिकडे आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्या आमच्या प्रिय बंधू आणि भगिनींच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. जखमी लवकरच बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो, अशी भावना व्यक्त केली.
हे ही वाचा : धावत्या लोकलमधून नारळ फेकला, पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...
मिळालेल्या माहितीनुसार, करुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा हा 29 असल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्हीके यांच्या सभेसाठी लाखो लोक उपस्थिती होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या एकूण घटनेची चौकशी सुरु आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेत काही मुलंही जखमी झालेली आहेत.
ADVERTISEMENT
