Medha Kulkarni, Pune : भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी कोथरूड परिसरात होत असलेला दांडीयाचा कार्यक्रम बंद पडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गरब्याच्या कार्यक्रमात आवाज मर्यादा ओलांडली म्हणून मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम स्थळी जात सुरू असलेला तो कार्यक्रम बंद पडला होता. दरम्यान, गरब्याचा कार्यक्रम कशामुळे बंद पाडला? डीजेविरोधात कशामुळे भूमिका घेतली? याबाबत मेधा कुलकर्णी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...
ज्येष्ठ नागरिकांच्या डीजेविरोधात वारंवार तक्रारी, त्यामुळे पवित्रा घेतला - मेधा कुलकर्णी
स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर मी हा पवित्र घेतला असून नियम भंग करत त्या ठिकाणी DJ वाजवले जात असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. मी यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली होती. मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी काहीही ॲक्शन घेतली नाही म्हणून मला जावे लागले. त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांची तक्रार वारंवार येत होती म्हणून मी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे स्पष्टीकरण मेधा कुलकर्णी यांनी दिलं आहे. तर या पुढे डीजेच्या विरोधात आणि जी आवाजाची मर्यादा वारंवार ओलांडली जात आहे. कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात जनआंदोलन उभं करु, असा इशाराही मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना दिलाय.
हा कार्यक्रम येथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही - कुलकर्णी
पुण्यात गरबा सुरु असताना डीजेचा आवाज वाढवण्यात आला होता. दरम्यान, मेधा कुलकर्णी तेथे पोहोचल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, दरवर्षी याठिकाणी मोठ्या प्रमाणात धिंगाणा होत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होतो. आता मला अनेक फोन आलेले आहेत. इतर ठिकाणी आरतीसाठी गेले होते, तेव्हा मला नागरिकांचे फोन येत आहेत. कॅन्सर झालेला पेशंट आहे, 90 वर्षांची व्यक्ती आहे. त्यांना त्रास होतोय. तुम्हाला हे मान्य आहे का सांगा? तुमच्या घरी देखील आजी-आजोबा असतील. लहान मुलं असतील. हा कार्यक्रम येथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही. कारण आजूबाजूंच्या लोकांना प्रचंड त्रास होत आहे. धार्मिकता सोडून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मी डीसीपी कदम यांना फोन केले. पीआय देशमाने यांना फोन केला. सीपी अमितेश कुमार यांना मेसेज केले. तरी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झाला नाही, त्यामुळे आम्हाला हा सत्याग्रह करावा लागला, असंही मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.
हेही वाचा : धावत्या लोकलमधून नारळ फेकला, पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...
ADVERTISEMENT
