LIVE: Shiv Sena UBT चा दसरा मेळावा सुरू, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना UBT चा दसरा मेळावा सुरू झाला आहे. ज्यामध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल.

shiv sena ubt dussehra rally begins uddhav thackeray speech will begin shortly at shivaji park

Shiv Sena UBT चा दसरा मेळावा सुरू

मुंबई तक

• 07:19 PM • 02 Oct 2025

follow google news

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे (शिवसेना-UBT) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आज  (2 ऑक्टोबर 2025) रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पारंपरिक असून, बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये सुरू केलेल्या परंपरेचा भाग आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT)हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा दावा करतो आणि शिवाजी पार्क हे मेळाव्याचं पारंपरिक स्थळ आहे. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे महागाई, बेरोजगारी, पूरग्रस्त भागातील मदत, ग्रामीण भागातील संकटे आणि महायुती सरकारच्या कारभाराबाबत नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

मागील दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखल झाला आहे. मात्र असं असलं तरी, लाकडी पट्ट्या टाकून आणि पाणी काढून व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, वाहतूक निर्बंध आणि रस्ते बंदी लागू आहेत. 

शिवसेनेच्या या मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक महाराष्ट्रभरातून येत आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क येथे प्रचंड गर्दी जमली आहे. 2022 साली पक्ष फुटीमुळे आता दोन वेगळे मेळावे होतात. उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर मेळावा होत आहे. तर शिंदे गटाचा मेळावा हा यंदा नेस्को प्रदर्शन केंद्र, गोरेगाव येथे होत आहे.

    follow whatsapp