Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय नेते आणि माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आयोजित केला. या दसरा मेळाव्यात संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याचे दिसून येत होते. बीड जिल्ह्यातील सावरघाट येथे हा दसरा मेळावा झाला. त्याच दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स झळकल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्यात संतापल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात बंदुक रोखत गोळीबार, हल्लेखोर म्हणाला, 'मी इथला भाई...' नेमकं काय घडलं?
दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स
दरम्यान, या मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकवण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या पोस्टरवर We Support Walmik Anna, 'कराड आमचे दैवत' असा मजकूर झळकत होता. कराडच्या समर्थनार्थ हे पोस्टर्सबाजी करण्यात आली. याबाबत अंजली दमानिया यांनी हे चित्र पाहून आपण आपली मान शरमेनं खाली घालणे गरजेचं असल्याचं म्हणत दमानियांनी संताप व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, मला हे ऐकून धक्का बसला. बॅनर झळकल्याने आपण आपली मान शरमेनं खाली घालणं गरजेचंय. या राजकारण आणि लोकांमध्ये इतकी विकृती निर्माण झाली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करूनही अशा लोकांची बॅनरबाजी केली जाते, याबाबत पंकजा मुंडेंना प्रश्न विचारणे गरजेचं आहे. पंकजा मुंडेंना वाल्मिक कराडबाबत नेमकं काय वाटतं? असा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारून फायदा नाही, कारण ते गॉन केस आहेत, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंनाही सोडलं नाही.
हे ही वाचा : Pune Crime : आधी तरुणीला सनकरून चापट दिली, नंतर लाथाबुक्क्यांनी केली बेदम मारहाण, सातारा रोडवर तरुणाचा लाज आणणारा प्रकार
दरम्यान, हा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट परिसरात मोठ्ा जोशात पार पडला. सकाळी वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. तेव्हा त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. भगवान बाबाचे असंख्य भक्त हे मेळाव्याला हजर राहिले होते.
ADVERTISEMENT
