Pune Crime : आधी तरुणीला सनकरून चापट दिली, नंतर लाथाबुक्क्यांनी केली बेदम मारहाण, सातारा रोडवर तरुणाचा लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, भररस्त्यात एका तरुणाने एका तरुणीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भररस्त्यात तरुणीला बेदम मारहाण

point

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर असल्याचं बोललं जातं. पण, याच पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. पु्ण्यात कोयता, गोळीबार आणि मारहाणीसारख्या अनेक घटना या सातत्याने घडत असतात. यामुळे पुण्यात गुंडांकडून दहशत निर्माण केली जात आहे. अशातच आता पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, भररस्त्यात एका तरुणाने एका तरुणीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा : उल्हासनगरमध्ये नवरात्रौत्सवात बंदुक रोखत गोळीबार, हल्लेखोर म्हणाला, 'मी इथला भाई...' नेमकं काय घडलं?

सातारा रस्त्यावर तरुणीला बेदम मारहाण

सध्या नवरात्रौत्सव सुरु असून महिलांचा सन्मान केला जातो, पण, पुण्यातील सातारा रस्त्यावर तरुणाने एका तरुणीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास के के मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर घडल्याचं सांगण्यात येत आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. तरुण-तरुणीत बाचाबाची झाली. तेव्हाच तरुणाची सटकली आणि त्याने तरुणाला लाथबुक्क्यांनी मारहाण केली.

उपस्थितांकडून बघ्याची भूमिका

यावेळी घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थित होते. मात्र, उपस्थितांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. महिलांचा कौटुंबिक छळ होतो, त्याचप्रमाणे महिला या समाजातही सुरक्षित नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे. दरम्यान तरुण आणि तरुणीच्या वादाचं नेमकं कारण अद्यापही समोर आलं नाही. सहकारनगर पोलिसांनी सांगितले की, घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार नोंदवली गेलेली नाही.

हे ही वाचा : धुळे : बाहेर भगत आलाय असं सांगून काकाने पुतणीला घरात नेलं, नंतर आतून कडी लावत तीन वर्षांच्या पुतणीचं केलं लैंगिक शोषण

दरम्यान, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. या दिवसाआढ पुण्यात गुन्ह्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या घटनेनं सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला गुन्हेगारीचं हॉट्स्पॉट बोललं जावू लागलं आहे. पुण्यात अशा अनेक घटना घडू लागल्या आहेत. या घटनेनं पुणे शहर हादरून गेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp