Uddhav Thackeray on Narendra Modi, Mumbai : देशभक्त असणारे सोनम वांगचूक (Sonam Wangchuck) एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोह ठरवण्यात आले. मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचूक यांनी लडाख येथे जवानांसाठी सोलरचं काम उभारलं. मोदींची स्तुती केली. मात्र, त्यांनी लेह-लडाखमध्ये त्यांनी आंदोलन सुरु केलं. मोदी बाबांनी त्यांना तुरुंगात टाकलं. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन आतमध्ये टाकलं. मोदींची स्तुती करत होते, तोवर वांगचूक देशप्रेमी होते. आता ते त्यांच्यासाठी देशद्रोही झाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेबाबत इंडिया टुडेने सर्व्हे केलाय.. आपण सत्तेत होतो त्या वेळेत पहिल्या 5 ते 6 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहे. मंत्र्यांच्या नावाने दारुचे परवाने दिले जात आहेत. पुरावे सादर करुनही मंत्र्यांना सोडून देत आहेत. मुंबई महापालिकेचे निवडणुक लावाच जनता वाट पाहात आहे. निवडणुका जवळ आले की, हिंदू-मुस्लिम करु लागले आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्रधर्म एक असला पाहिजे. घराबाहेर पडतो, तेव्हा आपलं राष्ट्र आपला धर्म असला पाहिजे, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावर या.. 100 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का? विषारी फळ तुमच्या झाडाला लागली आहेत. भागवत साहेबांना सांगता येत नसेल, असंही ठाकरेंनी सांगितलं.
मुस्लिमांच्या सर्वोच्च नेत्यांनी मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. भाजप नेत्यांमध्ये हिंमत आहे का? भागवतांना मुस्लिम धार्जिणे म्हणण्याची? मोहन भागवत म्हणाले, देशात राहातो तो प्रत्येकजण हिंदू आहे. सोफिया कुरेशींना भाजपवाले अतिरेक्यांची बहीण म्हणाले होते. हे तुमचं हिंदूत्व आहे. बिल्किस बानोंवर अत्याचार करणाऱ्यांची मिरवणूक काढत आहेत? हे तुमचं हिंदूत्व आहे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी उद्विग्न आहे. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या खात्यात दीड हजार टाकले गेले. भाजपची औलाद आता पगारी मतदार करत आहे. भाजपने आता स्वाभिमानी मतदार व्हायचं की, पगारी हे ठरवायचंय. महायुतीचे महाराष्ट्रातील तीन प्रमुख नेते केंद्राकडे मदत मागण्यासाठी दिल्लीत जायला हवे होते. पंतप्रधांना प्रस्ताव पाहिजे, फडणवीसांचा अभ्यास सुरु आहे. तोवर काहीतरी टेकवू. लोक विसरुन जातील. मत विकत घेण्यासाठी पैसे आहेत. उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी नाहीत.
संजय राऊत म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. आठ-आठ तास शेतकरी चिखलात आहे. आपण दोन तास चिखलात मेळावा घेतला तर काही अडचण नाही. हा आपला ओला दसरा मेळावा आहे. उद्धव ठाकरेंनी शस्त्रपूजा केली आहे. गद्दारांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही. त्यांनी दिल्लीवरुन अमित शाहांनी जोडे आणले आहेत. ते त्यांच्याकडून पूजले जाणार आहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो. धनुष्यबाणाची चोरी केली. घडाळ्याची चोरी केली. मुंबईतील चोर बाजाराचं नाव मोदी चोर बाजार ठेवा. इतक्या यांनी चोऱ्या केल्या आहेत.
हेही वाचा : क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल
ADVERTISEMENT
