क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल
Uddhav Thackeray criticized Narendra Modi : क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे, ठाकरेंची टीका

बाप देशप्रेमाचं नाटक करतो आणि पोरगा त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो
Uddhav Thackeray criticized Narendra Modi, Mumbai : "आशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो. तो माणूस बेशरम आहे. मग ऑपरेशन सुंदरचं थोथांड कशाला केलं? पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या हे तुम्ही सांगितलं. त्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळतो. बाप देशप्रेमाचं नाटक करतो आणि पोरगा त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. ही तुमची घराणेशाही आहे? 10 वर्ष सत्तेत असूनही हिंदू सुरक्षित नाही." असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जीवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातील खरं सोनं असतं. अनेक पक्षांचं शिवसेना फोडण्याकडे लक्ष होतं. त्यांनी काही जणांना पळवलं. जे पळवलं ते पितळ होतं. सोनं माझ्याकडे आहे. येताना मी बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेलं गाढव मी पाहिलं. मला माहिती आहे, सगळीकडे चिखल आहे. याचं कारण आहे कमळाबाई...कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचा चिखल केलाय. शेतकऱ्याची शेतजमीन वाहून गेली आहे. घरादारात देखील पाणी घुसलेलं आहे. शेतकरी आज विचारतोय आम्ही खायचं काय? एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. सर्व शिवसैनिकांनी आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. भुकंप झाला त्यावेळी आपण गाव दत्तक घेतलं होतं. काही जणांच्या आयुष्यात आपण फुलं जर फुलवलं तरी आयुष्याचं सार्थक होईल.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण सत्तेत होतं, तेव्हा बोंबलत होते, ओला दुष्काळ जाहीर करा. आता म्हणतात, अशी कोणती संज्ञाच नाही. सगळेच निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत केली पाहिजे. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती. निवडणुकीसाठी देखील केली नव्हती. माझं कर्तव्य म्हणून केली होती. 2017 ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये. आपण कर्जमुक्त केलं होतं. त्यानंतर कोरोना आला. आपण जे शेतकरी नियमित कर्ज फेडतील त्यांना अनुदान सुरु केलं होतं. संघाच्या दसऱ्या मेळाव्याबाबत मी बोलणार आहे. संघाची 100 वर्षे पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे. संघाला 100 वर्षे पूर्ण होतात आहेत, आज दुर्दैवाने स्वातंत्र्यसैनिक पारेख यांचं निधन झालंय. त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक आणलं. आपण त्याचा विरोध केला. कडवे डावे वगैरे ओळखत नाही. देशद्रोही आणि देशप्रेमी एवढंच आम्हाला माहिती आहे. याचा गैरवापर कसा होतोय ? हे सांगतोय. सोनम वांगचूक यांनी लडाख येथे जवानांसाठी सोलर उभारलं. ते मोदींची स्तुती केली. मात्र, त्यांनी लेह-लडाखमध्ये त्यांनी आंदोलन सुरु केलं. मोदी बाबांनी त्यांना तुरुंगात टाकलं. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन आतमध्ये टाकलं. मोदींची स्तुती करत होते, तोवर वांगचूक देशप्रेमी होते. आता ते त्यांच्यासाठी देशद्रोही झाले. तीन वर्ष मणिपूर जळतय. काल पर्वा मोदी मणिपूरमध्ये गेले. ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार? मोदींनी गेल्यावर तिथे मणिपूरच्या नावातच मणी आहे, म्हणाले. मणिपूरच्या नावातील मणी दिसला. पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले नाही का? भाजप म्हणजे अमिबा झाला आहे, वाटेल तसा पसरतो. शरीरात गेलं की पोट बिघडतं.
हेही वाचा : LIVE: Shiv Sena UBT चा दसरा मेळावा सुरू, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली