Mood of The Nation, India Today C Voter Survey : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करून राज्य सरकारने महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करायला सुरूवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'लाडक्या बहिणीं'चा 'लाडका मुख्यमंत्री' होण्याचा प्रयत्न सूरू केला आहे. असे असताना आता इंडिया टुडे सी व्होटरचा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून खरंच देशात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहे? त्यांना किती टक्के लोकांनी पसंती दिली आहे? हे जाणून घेऊयात. (india today c voter survey what eknath shinde number as a popular chief minister in conry mood of the nation survey)
ADVERTISEMENT
इंडिया टुडे सी व्होटरने देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? असा एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातून सहाव्या स्थानी आहेत. सर्व्हेनुसार शिंदेंना 3.1 टक्के लोकांनीच पसंती दिली आहे. दरम्यान जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सहाव्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी कोण आहे? अशी उत्सुकता नागरीकांना आहे.
सर्वांधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?
इंडिया टुडे सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार, देशातील सर्वांधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना देशातील 33 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर दुसऱ्या स्थानी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांना 14 टक्के लोकांची पसंती आहे. तर तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंबर लागतो. त्यांना 9 टक्के लोकांची पसंती आहे. त्यामुळे देशातले हे पहिले तीन मुख्यमंत्री आहेत जे देशात खुप लोकप्रिय आहेत.
हे ही वाचा : Badlapur Exclusive : ''आंदोलनात दिसल्यास FIR दाखल करणार'', पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांची धमकी
चौथ्या स्थानी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आहेत. त्यांना 4.7 टक्के लोकांची पसंती आहे. तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे पाचव्या स्थानी आहे. त्यांना 4.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यानंतर सहाव्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो. त्यांना 3.1 टक्के लोकांची पसंती आहे.
मुख्यमंत्री शिंदेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा नंबर लागतो. त्यांच्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे नंबर लागतात. आणि शेवटच्या दहाव्या स्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा नंबर लागतो.
राज्यात शिंदे किती लोकप्रिय आहेत?
दरम्यान इंडिया टुडे सी व्होटरने आपआपल्या राज्यात कोणता मुख्यमंत्री लोकप्रिय आहे? असा देखील एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत पहिल्या 10 स्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावच नाही आहे.
या सर्व्हेत सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग हे त्यांच्या राज्यात सर्वांधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्यातील 56 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर दुसऱ्या स्थानी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांचा नंबर लागतो. त्यांना 51 टक्के लोकांची पसंती आहे. आणि 46 टक्के मतांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे तिसऱ्या स्थानी आहेत.
हे ही वाचा : Badlapur : 'DCP चा फोन आला, FIR बदललं...ते प्रकरण दाबण्यासाठी...' कुटुंबीयांनी सांगितली Inside Story
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या राज्यातील 46 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे त्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे 44 टक्के लोकांच्या पसंतीमुळे ते पाचव्या स्थानी आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 44 टक्के लोकांच्या पसंतीसह सहाव्या स्थानी आहेत.
तसेच अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खाडू यांना त्यांच्या राज्यात 41 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ते सातव्या स्थानी आहेत. तर आठव्या स्थानी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा नंबर लागतो. एम के स्टॅलिन यांना 40 टक्के लोकांची पसंती आहे.
सर्व्हेनुसार देशात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानी असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 39 टक्के लोकांच्या पसंतीसह 9 व्या स्थानी आहे. तर दहाव्या आणि शेवटच्या स्थानी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा नंबर लागतो. त्यांना त्यांच्या राज्यात 38 टक्के लोकांची पसंती आहे.
दरम्यान आपआपल्या राज्यात लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा पहिला10 मध्येही समावेश नाही आहे. त्यामुळे सर्व्हेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याचा अंदाज आहे.
दरम्यान AajTak चा मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण 15 जुलै ते 10 ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणात 1,36,436 लोकांची मते जाणून घेण्यात आली. देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले, ज्याद्वारे जनतेचे विचार आणि मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वेक्षणामुळे देशाच्या सद्यस्थितीबाबत जनतेचे विचार पुढे आले आहेत.
ADVERTISEMENT
