मुंबई: इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2025 मध्ये (India Today Conclave Mumbai 2025) बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला जो फटका बसला.. विशेषत: महाराष्ट्रात त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाची काय चूक झाली हे याबाबत स्पष्टपणे त्यांचं मत व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
लोकसभा 2024 निवडणुकीत भाजपला थोडासा फटका बसला कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) भाजपला फारशी मदत केली नाही? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी विरोधकांनी कशा प्रकारे प्रचार केला याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी कोणत्याही पद्धतीने आरएसएसकडे बोट दाखवलं नाही.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मी असं मानत नाही की आरएसएसने मदत केली नाही, जिथवर महाराष्ट्राची बाब आहे.. महाराष्ट्रात आम्हाला एकाच गोष्टींमुळे सेटबॅक बसला. ते कारण असं होतं की, एक नरेटिव्ह खूप यशस्वीपणे आमच्या विरोधकांनी अगदी तळापर्यंत पोहचवला की, भाजप निवडून आल्यास संविधान बदलेल. आणि दुर्दैवाने जेव्हा आम्हाला हे दिसलं की, हे लोकं ही गोष्ट करत आहेत तेव्हा आम्हाला इथे अतिआत्मविश्वास होता.. आम्हाला वाटलेलं की, प्रत्येक निवडणुकीत हे लोकं हीच गोष्ट बोलतात.. त्यामुळे ही गोष्ट लोकांना कशी काय पटेल?'
हे ही वाचा>> '...तरीही काही लोकांना मिरची लागली', देवाभाऊ आणि शिवाजी महाराजांचं बॅनर.. CM फडणवीसांचा निशाणा कोणावर?
'पण यावेळी त्यांनी एक प्रकारे जे जाळं तयार केलं होतं. भारत जोडो नावाचं.. जे मी विधानसभेतही दाखवलेलं.. नावासकट दाखवलेलं की, यूपीएच्या सरकारने ज्यांना अर्बन माओवादी म्हणून घोषित केलेलं अशा संघटना देखील काँग्रेससाठी महाराष्ट्रात भारत जोडोच्या अंतर्गत असा प्रचार करत होते की, भाजप संविधान बदलणार आहे.'
'पण आमचा अतिआत्मविश्वास होता की ज्यामुळे आम्ही प्रभावीपणे त्या नरेटिव्हला विरोधच केला नाही. त्यामुळे तो प्रचार तळागाळापर्यंत पोहोचला आणि लोकांना विशेषत: एसी, एसटी समुदायाचे जे लोकं आहेत ज्यामध्ये आमचाही मोठा मतदार आहे. हा मतदार त्यामुळे बदलला. पण लोकसभेनंतर आम्ही तात्काळ ही गोष्ट लक्षात घेऊन एक प्रचार केला. लोकांपर्यंत जाऊन आम्ही सत्य पोहचवलं.'
हे ही वाचा>> मटण खाता, घाणेरडे आहात, असं म्हणत मराठी माणसांना घर नाकारलं जातं, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
'याचा परिणाम असा झाला की, जो मतदार आमच्यापासून दुरावला होता. तो विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे आमच्यासोबत आला आणि आज तो आमच्यासोबतच आहे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवण्यात RSS बजावणार मोलाची भूमिका?
दरम्यान, फडणवीसांच्या या विधानाने त्यांनी आरएसएसबाबत कोणतीही वादग्रस्त टिप्पणी केली नाही. तसंच आरएसएस आणि भाजप या दोन वेगवेगळ्या संघटना असल्याचंही त्यांनी यावेळी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र, असं असलं तरी भाजपच्या अंतर्गत राजकारणात आरएसएसचा मोठा हात असतो असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे आगामी काळातील नेतृत्व, राष्ट्रीय नेतेपद या सगळ्यात आरएससस निश्चित निर्णायक भूमिका बजावू शकतं.
ADVERTISEMENT
