मटण खाता, घाणेरडे आहात, असं म्हणत मराठी माणसांना घर नाकारलं जातं, आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

Aaditya Thackeray : मटण खाता, घाणेरडे आहात असं म्हणत मराठी माणसांना घर नाकारतात, यावर का बोललं जात नाही? शिवसेनेच्या खळखट्याकबाबत आदित्य ठाकरेंचं भाष्य

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या खळखट्याकबाबत आदित्य ठाकरेंचं भाष्य

point

मराठी भाषेवरुन होणाऱ्या हिंसाचाराबाबत ठाकरेंनी भूमिका मांडली

Aaditya Thackeray, Mumbai : "मराठी माणसांना ते मांसहार करत असल्यामुळे घर नाकारलं जातं.  तुम्ही मटण खाता,घाणेरडे आहात, असं म्हणत मुंबईतील काही भागात मराठी माणसांना घर नाकारलं जातं. यावर का बोललं जात नाही?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत होणाऱ्या हिंसाचाराबाबत आदित्य ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते India Today Conclave मध्ये बोलत होते. 

हेही वाचा : मुलाच्या शिक्षणाच्या फीसचं टेन्शन, अतिवृष्टीने फास आवळला, बार्शीतील दोन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं

काही हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी लोकांना प्रवेश दिला जात नाही- आदित्य ठाकरे 

आदित्य ठाकरे म्हणाले, हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी असल्याने प्रवेश दिला जात नाही. मराठी माणसांनी हिंदी भाषिकांना मारहाण केली, ही एकच बाजू का दाखवली जाते? हिंसाचाराला दोन्ही बाजूंनी विरोध व्हायला हवा. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांना नियंत्रित करु शकत नाही. मी आमच्या लोकांच्या भावनांना नियंत्रित करु शकत नाही. हे प्रत्येक राज्यात घडतं हे लक्षात घ्या. 

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, वरळी हा माझा मतदारसंघ आहे. वरळीत संपूर्ण देशातून लोक येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं येतात. येथे येऊन संसार सुरु करतात, नोकरी शोधतात. मुंबईची संस्कृती प्रत्येकाचं स्वागत करते. गेल्या 50 वर्षांपासून मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. असं असताचा मुंबईत सर्वांचं स्वागत होत राहिलंय. मुंबईत महिला सुरक्षित आहेत. मुंबईत हिंदी सिनेमाही वाढलाय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp