Exclusive Interview: ‘…म्हणून BJP ने नवे मुख्यमंत्री निवडले’, PM मोदींनी सांगितली Inside स्टोरी

मुंबई तक

• 03:26 PM • 29 Dec 2023

PM Modi Exclusive Interview: इंडिया टुडे समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक (प्रकाशन) राज चेंगप्पा यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदींनी भाजपमधील बदलांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

india today pm modi exclusive interview i am the biggest example said pm modi on the appointment of new faces to post of chief minister

india today pm modi exclusive interview i am the biggest example said pm modi on the appointment of new faces to post of chief minister

follow google news

PM Modi Exclusive Interview on CM Post: नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने नुकत्याच जिंकलेल्या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी पूर्णपणे नवीन चेहरे निवडून राजकीय विश्लेषकांना देखील आश्चर्याचा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक राज्यांमध्ये अशा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आता खुद्द पंतप्रधान मोदींनी यावर उघडपणे बोलले. (india today pm modi exclusive interview i am the biggest example said pm modi on the appointment of new faces to post of chief minister)

हे वाचलं का?

इंडिया टुडे समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक (प्रकाशन) राज चेंगप्पा यांच्याशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी भाजपच्या या ट्रेंडबद्दल नेमकं भाष्य् केलं.

नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत PM मोदींनी सांगितली Inside स्टोरी

पीएम मोदी म्हणाले की, ‘हा नवीन ट्रेंड नाही. खरे तर भाजपमधील या प्रथेचे मी स्वत: सर्वात मोठे उदाहरण आहे. मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो तेव्हा मला काहीही प्रशासकीय अनुभव नव्हता. मी विधानसभेवर निवडूनही गेलो नव्हतो. होय, पण आज आपल्याला हे नव्या ट्रेंडसारखे वाटू शकते, कारण आज इतर बहुतेक पक्ष घराणेशाहीचे पक्ष आहेत.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

घराणेशाहीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना बरंच फटकारलं.. यावर बोलताना मोदी म्हणाले की, ‘घराणेशाही असलेल्या पक्षांना हे लोकशाही विचारमंथन कठीण वाटते. पण एकाच वेळी अनेक पिढ्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. भाजपच्या अध्यक्षांकडे बघा दर काही वर्षांनी तुम्हाला नवीन चेहरे दिसतील. आमचा केडर आधारित पक्ष आहे, जो स्पष्ट ध्येय घेऊन चालतो. आम्ही सर्व तळागाळातील कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली आणि समर्पण आणि कठोर परिश्रमातून वर आलो आहोत. याच बांधिलकीमुळे विशेषत: तरुण हे भाजपशी जोडले गेले आहेत.’ असं पंतप्रधान म्हणाले.

हे ही वाचा>> Shiv Sena UBT: ‘त्या एका जिद्दीने मी उभा आहे…’, उद्धव ठाकरेंनी थेट मोदींनाच दिलं चॅलेंज!

पीएम मोदी पुढे असंही म्हणाले की, ‘लोकशाहीत नवीन पिढ्यांना आणि नवीन रक्ताला संधी देणे खूप महत्वाचे आहे. या लोकशाही विचारमंथनामुळेच लोकशाही जिवंत राहते. या लोकशाही मंथनानेच आपला पक्ष चैतन्यशील बनतो आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आकांक्षा आणि आशांची ज्योत तेवत राहते. मेहनतीच्या जोरावर आपणही पक्षात वर येऊ शकतो, असे त्यांना वाटते.’

हे ही वाचा>> राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेला फक्त 5 लोकं, महाराष्ट्रातून एकाच व्यक्तीला संधी!

‘आमच्या पक्षाला वेगवेगळे प्रयोग करण्याची सवय आहे. गुजरातमध्ये आम्ही सर्व नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात निवडले. दिल्लीत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व नवीन चेहऱ्यांची निवड केली.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी तीन राज्यातील मुख्यमंत्री म्हणून नव्या चेहऱ्यांना नेमकी संधी का दिली याबाबत भाष्य केलं.

    follow whatsapp