ज्यांच्यासोबत चर्चा केली त्या मंत्र्यांनाच जरांगेंनी फैलावर का घेतलं?

मुंबई तक

• 09:17 AM • 06 Sep 2026

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलंय. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानेही जरांगेंसोबत चर्चा केली. परंतु त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. आता जरांगे पाटील यांनी राज्य सरकार तसेच संबंधित मंत्र्यांवर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला.

Manoj Jarange Patil Hunger Strike

Manoj Jarange Patil Hunger Strike

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे पाटलांचा उपोषण मागे घेण्यास नकार

point

ज्यांच्यासोबत चर्चा केली त्या मंत्र्यांनाच जरांगेंनी फैलावर का घेतलं?

Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची अडवणूक होत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारविरोधी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

हे वाचलं का?

पाणी, वैद्यकीय तपासणी अन् उपचार बंद

जात प्रमाणपत्राच्या पडताळणीबाबत बोलताना जरांगे यांनी प्रशासकीय कारभारावर कडाडून टीका केली. हैदराबाद गॅजेटनुसार दाखल केलेले प्रकरण विनाकारण विभागीय आयुक्तांकडे पाठवले जात असून, अधिकारी नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यंत्रणेतील या मनमानी कारभारामुळे आणि समाजाच्या होत असलेल्या हेळसांडीमुळे मराठा समाजात तीव्र संताप उसळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी आपले पाणी, वैद्यकीय तपासणी आणि उपचारही बंद असल्याचे जाहीर केले.

हे ही वाचा : Vidyanand Bapat Interview : मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची भूमिका काय?

मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान

या संकटादरम्यान मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी ऐरणीवर आणला. एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत एका पात्र मुलीला तिची एसईबीसी पात्रता असूनही राज्य कोठ्यातून डावलून खुल्या प्रवर्गात टाकण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक अशा चूका करून मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. आरक्षणासंदर्भातील या तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

हे ही वाचा : पुणे मेट्रो : विद्यानंद बापटांनी दिलेली FIR पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर

आंदोलन मोडून काढण्याचा हेतू

सरकारने कितीही प्रयत्न केले तरी हा लढा थांबणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. आंदोलनाला बदनाम करण्याचे किंवा ते मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी आपले उपोषण आणि सरकारविरुद्धचा संघर्ष तीव्र ठेवण्याचा निर्धार केला आहे.