बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र वापरुन कुणाल कामराचे हक्कभंग समितीला स्पष्टीकरण, एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं

Kunal Kamra reply alleging breach of legislative privilege issued by Pravin Darekar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकात्मक विडंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली होती. याबाबत आता कुणाल कामराने हक्कभंग समितीकडे स्पष्टीकरण दिलंय. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात..

Kunal Kamra reply alleging breach of legislative privilege issued by Pravin Darekar

Kunal Kamra reply alleging breach of legislative privilege issued by Pravin Darekar

मुंबई तक

11 Apr 2026 (अपडेटेड: 11 Apr 2026, 04:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र वापरुन कुणाल कामराचे हक्कभंग समितीला स्पष्टीकरण

point

एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं

Kunal Kamra reply alleging breach of legislative privilege issued by Pravin Darekar :  कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना Bholi Si Surat हे गाणं विडंबनात्मक पद्धतीने सादर केलं होतं. त्यानंतर कामराने शो सादर केला , त्या स्टुडिओची शिवसैनिकांकडून (शिंदेसेना) तोडफोड करण्यात आली होती. इतकंच नाही, तर त्यानंतरच्या काळात कुणाल कामरा याच्याविरोधात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे कुणाल कामराला हक्कभंग समितीने नोटीस बजावली होती. यापूर्वी तो विधानभवनात स्पष्टीकरण देण्यासाठी हजर झाला होता. मात्र, प्रवीण दरेकर गैरहजर होते, त्यामुळे एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर कुणालने काल शुक्रवारी (दि.10) पुन्हा विधानसभेत जात याबाबत स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, त्याने हक्कभंग समितीला शिंदेंबाबत सादर केलेल्या स्टेटमेंटला काय उत्तर दिलंय? जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

बाळासाहेब ठाकरेंचं व्यंगचित्र सादर करत कुणाल कामरा काय म्हणाला? 

कुणाल कामराने त्याच्या विडंबनात्मक गाण्याबाबत स्पष्टीकरण देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींबाबत रेखाटलेलं एक व्यंगचित्र सादर केलंय. याबाबत बोलताना तो म्हणाला, "मी सादर केलेल्या विनोदांमुळे मला गेल्या वर्षाभरात अनेक कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागले आहे.  मी भारतातील एक अत्यंत तिखट आणि प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून चाललेल्या वादाबद्दल केलेल्या एका विनोदामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक दशकांच्या आणि विविध राजवटींच्या कारकिर्दीत राजकीय व्यंगचित्रकार म्हणून काम करताना अनेक सत्ताधारी व्यक्तींची, अगदी तत्कालीन पंतप्रधानांचीही खिल्ली उडवली आणि त्यांना लक्ष्य केले (आणि यासाठी त्यांना कधीही 'विशेषाधिकार भंगा'च्या कारवाईला सामोरे जावे लागले नाही). राजकीय उपहास (Satire) हाच त्यांच्या राजकीय विचारसरणीचा पाया राहिला आहे, ज्याचा खरा वारसदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतात. तर मग बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा जपण्यामध्ये व्यंगचित्रकार आणि पॉलिटिकल satirists असणाऱ्या व्यक्तींच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचाही समावेश असेल."

"मला आशा आहे की, या प्रकरणामुळे राज्यघटनेतील जास्त परिचित नसलेल्या तरतुदींविषयी (विधिमंडळ विशेषाधिकार भंगाशी संबंधित) प्रकाश पडेल. ज्याचा वापर निवडून आलेले नेते नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी किंवा त्यांना धमकावण्यासाठी करू शकतात.  21 व्या शतकातील लोकशाहीत निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींकडे त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याचे अधिकार असणे, ही प्रत्येक नागरिकासाठी चिंतेची बाब आहे. जेव्हा आपण आपले नेते निवडतो, तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे की, हे अधिकार आणि विशेषाधिकार वापरण्यासाठी आपण या व्यक्तींवर विश्वास ठेवू शकतो का?" असा सवालही कुणाल कामरा याने उपस्थित केलाय.
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कानाखाली मारल्याचा राग, पत्नीने पतीला डोक्यात दगड घालून संपवलं; रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिली