Ram Mandir Pran Pratishtha: आमंत्रण मिळूनही अडवाणी का गेले नाही अयोध्याला, कारण…

मुंबई तक

• 08:38 AM • 22 Jan 2024

Ram Mandir Pran Pratishtha and Lal Krishna Advani: राम मंदिर सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण मिळून देखील ते या सोहळ्याला हजर राहू शकले नाही. त्यामुळे याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. ज्याबाबत आता नेमकी माहिती समोर आली आहे.

lal krishna advani will not attend the ram mandir pran pratishtha of ram lalla ayodhya tour canceled due to cold and bad weather

lal krishna advani will not attend the ram mandir pran pratishtha of ram lalla ayodhya tour canceled due to cold and bad weather

follow google news

Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अयोध्या: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आज (22 जानेवारी) नवीन राम मंदिरात (Ram Mandir) राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. त्यांना आमंत्रण मिळून देखील ते हजर न राहिल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र, याबाबत अडवाणींच्या वतीने असं सांगण्यात आलं की, थंडी आणि खराब हवामानामुळे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. अडवाणी हे 96 वर्षांचे आहेत. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. (lal krishna advani will not attend the ram mandir pran pratishtha of ram lalla ayodhya tour canceled due to cold and bad weather)

हे वाचलं का?

आरएसएसचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी पोहोचले होते आणि त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी अडवाणी म्हणाले होते की, अशा भव्य सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण श्री रामाचे मंदिर हे केवळ पूजेचे मंदिर नाही, अशी एकमेव घटना आहे. या देशाचे पावित्र्य आणि या देशाच्या प्रतिष्ठेच्या स्थापनेचे हे निमित्त आहे.

हे ही वाचा>> Ram Mandir : महाराष्ट्राचा खारीचा वाटा! राम मंदिरासाठी पाठवली ‘ही’ महत्त्वाची गोष्ट!

‘काय म्हणाले लालकृष्ण अडवाणी?’

अडवाणी पुढे म्हणाले की, ‘सर्वप्रथम.. इतक्या वर्षांनंतर आम्ही भारताच्या ‘स्व’ चे प्रतीक पुन्हा तयार केले. ते आमच्या प्रयत्नांच्या जोरावर झाले. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपली दिशा शोधण्याचा प्रयत्न अनेक दशकांपासून करत आहोत, आपल्याला ती सापडली आहे आणि ती प्रस्थापित झाली आहे. प्रत्येकाच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण मंगलमय झाले आहे. आणि अशा वेळी आपण प्रत्यक्ष तिथे हजर राहू, ती घटना पाहू, त्याचे सहकारी बनू… हे कुठल्यातरी जन्मात केलेले सत्कर्म झाले असावे आणि त्याचे फळ आपल्याला मिळत आहे. म्हणून मी आपला कृतज्ञतापूर्वक आभारी आहे. ही एक संधी आहे जी मागूनही मिळत नव्हती, मला ती मिळाली आहे…मी त्यात नक्कीच सहभागी होणार आहे.’

‘अडवाणींना आमंत्रित केले होते’

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले होते की, लालकृष्ण अडवाणी यांना 22 जानेवारीला अयोध्येतील अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अयोध्येतील समारंभात अडवाणींना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील, असेही आयोजकांनी सांगितले.

हे ही वाचा>> Ram Mandir Live: अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा… पण उद्धव ठाकरे, राहुल गांधीसह विरोधकांचा काय प्रोगाम?

आज अयोध्येतील हवामान कसे आहे?

सकाळी ६ वाजता अयोध्येत ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तथापि, पुढील काही तासांमध्ये तापमान आणि दृश्यमानतेत किंचित घट झाली. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार अयोध्येत आज थंडीचा दिवस आहे. आज किमान तापमान 7 आणि कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस आहे.

    follow whatsapp