‘मविआ’पासून दूर जाण्यासाठी 12 जागांची मागणी? आंबेडकर स्पष्टच बोलले, काँग्रेसला दाखवला आरसा

प्रशांत गोमाणे

• 02:46 PM • 31 Dec 2023

स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून युती होते. तुमची ताकद निवडून येण्याची नाही. तुमची ताकद नाही म्हणून समझोता करून निवडून येण्याचा प्रयत्न करता. त्या प्रयत्नात तुम्ही सगळ्यांना समान भागीदार म्हणून वागवले पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

loksabha election 2024 prakash ambedkar formula for maha vikas aghadi 12 contentstant shivsena congress ncp maharashtra politics

loksabha election 2024 prakash ambedkar formula for maha vikas aghadi 12 contentstant shivsena congress ncp maharashtra politics

follow google news

Prakash ambedkar formula for maha vikas aghadi :  देशात 2024 च्या लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी विरूद्ध भाजप प्रणित एनडीएत थेट लढत होणार आहे. तर राज्यात महाविकास आघाडी (maha vikas Aghadi) विरूद्ध महायुतीत (mahayuti) लढत असेल. मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीत अद्याप वंचित आघाडीचा समावेश झाला नाही आहे. तरी देखील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला वंचित सोबत प्रत्येकी 12 जागा लढवण्याच सुत्र ठरवाव, असे मत माडले होते. मात्र वंचितने महाविकास आघाडीपासून दुर जाण्यासाठी 12 जागांच प्रस्ताव ठेवल्याचा आरोप होतोय. या आरोपांवर आता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे. (loksabha election 2024 prakash ambedkar formula for maha vikas aghadi 12 contentstant shivsena congress ncp maharashtra politics)

हे वाचलं का?

आम्ही युतीत न येण्यासाठी जास्त जागांची मागणी करतोय असा जे आरोप करतात, मागच्या निवडणुकीत किती ठिकाणी हरले हा हिशोब काढला तर 40 ठिकाणी हरले आहेत. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसं आहे. स्वत:ला काय करायचे नाही. तुमच्याकडे किती मते याचा विचार करा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून युती होते. तुमची ताकद निवडून येण्याची नाही. तुमची ताकद नाही म्हणून समझोता करून निवडून येण्याचा प्रयत्न करता. त्या प्रयत्नात तुम्ही सगळ्यांना समान भागीदार म्हणून वागवले पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : आई-वडिलांसह बहिणीची कुऱ्हाडीने हत्या, पोटच्या पोरानेच का घेतला जीव?

महायुतीत अजित पवार किमान 8 जागा, एकनाथ शिंदे 14 जागा आणि भाजपा 26 जागा लढेल अशी परिस्थिती आहे. तर महाविकास आघाडीला प्रत्येकी 12-12 जागांचा फॉर्म्युला दिला. शिवसेनेकडे 18 जागांवर लढायचं म्हणत असेल, तर त्यांनी कुणाशीची युती केली नसती. मात्र 18 जागी तुम्ही निवडून येऊ शकत नाही. म्हणून तुम्ही वाटाघाटी करताय, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

आमच्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा पडल्या असा आरोप केला जातो.पण ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून असाल तेव्हा निवडणूक लढणे हा मुख्य अजेंडा असतो. जर तुम्ही पडणार असाल तर निवडणुका लढवूच नका. तुम्ही भानगडीत कशाला पडताय? असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

    follow whatsapp