Lok Sabha election 2024 : शरद पवारांनी मोदींची पुतीन यांच्याशी का केली तुलना?

मुंबई तक

14 Apr 2024 (अपडेटेड: 14 Apr 2024, 04:59 PM)

Sharad Pawar Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांनी रामटेक येथील सभेत बोलताना विरोधकांना एकही जागा जिंकून देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यावरून शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागले.

शरद पवार यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार.

follow google news

Sharad Pawar On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान केले. पवारांनी मोदींची तुलना रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली. पुतीन आणि मोदी यांच्यात काही फरक राहिलेला नाही, असं पवार का म्हणाले तेच जाणून घ्या. (Sharad Pawar Says PM Narendra Modi is Similar to vladimir putin)

हे वाचलं का?

शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी अकलूज येथे आले होते. शिवरत्न या बंगल्यावर सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पवारांची पत्रकार परिषद झाली. 

याच पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावर बोट ठेवत शरद पवार यांनी ते पुतीन यांच्यासारखेच बनले असल्याचे विधान केले. 

'चारशे पार'च्या घोषणेवर पवारांचं उपरोधिक उत्तर

भाजप चारशे पार म्हणत आहे, त्यात कितपत तथ्य आहे? या प्रश्नाला पवारांनी सुरुवातीला उपरोधिक उत्तर दिले. ते म्हणाले की, "नाही. थोडी चूक आहेत त्यात. कारण ५४३ जागा त्यामुळे त्यांनी तिथपर्यंतचा आकडा सांगणं योग्य राहील."

शरद पवार मोदींबद्दल काय बोलले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीच्या आरोपावर पवार म्हणाले की, "पंतप्रधानांबद्दल बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. ज्या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. सांगतात. बोलतात. हल्लीची त्यांची भाषणे पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा करणारी आहेत."

हेही वाचा >> पुन्हा भाजप सरकार आल्यास 'या' गोष्टी देणार 'मोफत'!

"जवाहरलाल नेहरूंना जाऊन किती वर्षे झाली. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यांच्या आंदोलनात काय योगदान दिलं. या देशात संसदीय लोकशाही स्थापन करण्यात त्यांचं योगदान काय होतं. हे ऐतिहासिक योगदान आहे. असं असताना आजचे पंतप्रधान आपला कार्यक्रम सांगण्याऐवजी नेहरूंवर टीका टिप्पणी करतात."

मोदींचं कोणतं विधान शरद पवारांना खटकलं?

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "त्यांचं (नरेंद्र मोदी) एक भाषण मी ऐकलं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की, एकही माणूस विरोधी पक्षाचा येऊ देऊ नका. लोकशाहीमध्ये जसा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा असतो, तसा विरोधी पक्षही महत्त्वाचा असतो. एक पण माणूस निवडून देऊ नका, ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यात काही फरक नाही. या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत", असे पवार यांनी सांगितले.

मोहिते पाटील सोबत येण्याचा परिणाम राज्यात होणार?

विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आले आहेत. त्याचा परिणाम थेट बारामती, माढा, सोलापूर या लोकसभा मतदारसंघात होईल, असे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. पण विजयसिंह मोहिते पाटील हे महाविकास आघाडीत येण्यामुळे कशी समीकरणे बदलणार, याबद्दल शरद पवारांनीही भाष्य केले.

हेही वाचा >> शरद पवारांकडून शिक्कामोर्तब! माढ्यासाठी केली उमेदवाराची घोषणा 

माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, "निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर, त्यात तुम्हाला कळेल. हे जे काही निर्णय आहेत. या निर्णयांचा संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तर राज्यात जातो. लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा, असा हा संदेश आहे. त्याचा उपयोग आम्हा लोकांना होईल."

 

    follow whatsapp