BJP Manifesto 2024 : पुन्हा भाजप सरकार आल्यास 'या' गोष्टी देणार 'मोफत'!
BJP releases manifesto for Lok Sabha polls : भाजपने काही गोष्टी मोफत देण्याची घोषणा केली आहे. जाहीरनाम्यात या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक २०२४
भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला
भाजपने चार मोठ्या घोषणा केल्या
BJP's Manifesto for General Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले संकल्प पत्र म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प पत्राचे अनावरण करण्यात आले. पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पुढील 5 वर्षे काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय मोफत मिळणार, याबद्दल काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (BJP released its manifesto for Lok Sabha election 2024)
तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चार 'जाती' आहेत, हे लक्षात घेऊन संकल्प पत्र तयार करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधानांनी मोफत वीज योजना आणि मोफत धान्य योजनेंतर्गतही अनेक मोठ्या घोषणा केल्या.
स्वानिधी योजना (पीएम स्वानिधी योजना), उज्ज्वला योजना, आयुष्मान योजना आणि इतर योजनांची व्याप्ती वाढवण्याबाबतही घोषणा केली.










