'कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर...', पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

Nitesh Rane facebook post : “गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी. पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… आता ती वेळ आली आहे,” अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली असून, या वक्तव्यातून येणाऱ्या काळात ते आक्रमक भूमिका घेणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Nitesh Rane facebook post

Nitesh Rane facebook post

मुंबई तक

22 Dec 2025 (अपडेटेड: 22 Dec 2025, 01:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर...'

point

पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

Nitesh Rane facebook post : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीतील निकालाचा धक्का बसल्यानंतर त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सूचक भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे.

हे वाचलं का?

“गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी. पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… आता ती वेळ आली आहे,” अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली असून, या वक्तव्यातून येणाऱ्या काळात ते आक्रमक भूमिका घेणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मालवण अन् कणकवलीमध्ये नितेश राणेंचा पराभव

वेंगुर्ले नगरपालिकेत भाजपने आपला गड अबाधित राखला. येथे भाजपचे दिलीप ऊर्फ राजन गिरप यांनी विजय मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. चौरंगी लढतीत काँग्रेसचे ताकदवान उमेदवार विलास गावडे यांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

मालवणमध्ये मात्र शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले. आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी मोठा विजय मिळवला. ठाकरे गटाच्या पूजा करलकर यांचा येथे पराभव झाला, तर भाजपच्या शिल्पा खोत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

कणकवली नगरपालिकेत मात्र पालकमंत्री नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल समोर आला. भाजप आणि सर्वपक्षीय शहर विकास आघाडी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी 145 मतांनी विजय मिळवला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा निसटता पराभव झाला.

सावंतवाडीत नितेश राणेंना यश पण इतर ठिकाणी पराभव

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल रविवारी दुपारी जाहीर झाला. या निकालात काही ठिकाणी भाजपला मोठे यश मिळाले असले, तरी काही ठिकाणी पक्षाला अनपेक्षित धक्क्यालाही सामोरे जावे लागले. सावंतवाडी नगरपालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेचे नेते आणि आमदार दीपक केसरकर यांना येथे मोठा राजकीय धक्का बसला. भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी निर्णायक विजय मिळवला, तर केसरकर गटाच्या अॅड. नीता कविटकर-सावंत यांचा पराभव झाला.

एकूणच जिल्ह्यात महायुतीने समाधानकारक कामगिरी केली असली, तरी कणकवलीतील निकालामुळे नितेश राणेंची पोस्ट अधिक महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना युती असताना सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आमनेसामने उभे ठाकले होते. सुरुवातीला सौहार्दपूर्ण वाटणारी ही लढत नंतर तीव्र संघर्षात बदलली. प्रचारादरम्यान नितेश राणे आणि नीलेश राणे एकमेकांविरोधात थेट मैदानात उतरले होते. पैशांच्या वाटपाचे आरोप, स्टिंग ऑपरेशनसारखे प्रकार यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली. अशा पार्श्वभूमीवर नितेश राणेंची पोस्ट आगामी राजकीय घडामोडींचे संकेत देणारी मानली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिलाच, शिक्षेलाही स्थिगिती

    follow whatsapp