'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन, आहेत तरी कुठे?

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 09:04 AM)

Omraje Nimbalkar : राज्यासह संपूर्ण देशात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु आहे. मात्र, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सध्या मौन बाळगलंय.

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन,

point

ओमराजे निंबाळकर सध्या आहेत तरी कुठे?

Omraje Nimbalkar, धाराशिव, गणेश जाधव : 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे बहुतांश खासदार दिल्लीत दाखल होत असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते. मात्र, 'ऑपरेशन टायगर'च्या घडामोडींमध्ये सहभागी होण्यासाठी ते दिल्लीला जाणार का? याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: महागाईच्या काळात पैसा वाढवण्याचे सर्वोत्तम मार्ग; फक्त Saving नाही तर…

फोनवर सहज उपलब्ध होणाऱ्या ओमराजे निंबाळकरांचं मौन

विशेष म्हणजे, फोनवर सहज उपलब्ध होणारे आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर तात्काळ प्रतिक्रिया देणारे ओमराजे निंबाळकर यांनी कालपासून या विषयावर माध्यमांसमोर कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच त्यांच्या समाजमाध्यमांवरही 'ऑपरेशन टायगर' संदर्भात कोणतीही पोस्ट किंवा भूमिका समोर आलेली नाही.

त्यांच्या या मौनामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दिल्लीतील घडामोडी आणि ओमराजे निंबाळकर यांची पुढील भूमिका याकडे धाराशिवसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मौनाचा नेमका अर्थ काय, याबाबत चर्चा रंगत असून ते 'ऑपरेशन टायगर'चा भाग होणार का? याविषयीही अंदाज बांधले जात आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप, ऐन रात्री ‘ऑपरेशन टायगर’ सुरू.. ठाकरेंचे खासदार थेट…

दरम्यान, काही निकटवर्तीयांकडून ते या राजकीय घडामोडींचा भाग होऊ शकतात आणि पक्षांतराची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सध्या तरी ओमराजे निंबाळकर पुण्यातच असून त्यांच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजाभाऊ वाजेंनी केली भूमिका स्पष्ट 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांदरम्यान वाजे यांनी आपल्या भूमिकेबाबत कोणतीही संदिग्धता नसल्याचे म्हटले. राजाभाऊ वाजे आज दिल्लीला रवाना होत असून दुपारी 3 वाजता होणाऱ्या संसदीय समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे त्यांनी सांगितले.