ओमराजे कोर्टाबाहेर आले, ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

Omraje Nimbalkar : आज 20 जून 2026 रोजी पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी खटल्याचा निकाल सुनावण्यात आला. या सुनावणीसाठी ओमराजे कुटुंबासह कोर्टा आले होते. अशातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कोर्टाबाहेर आले होते. यामुळे तिथे मोठा गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा आहे. 

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

मुंबई तक

• 01:58 PM • 20 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोर्टाबाहेरची परिस्थिती काय?

point

उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते कोर्टाबाहेर

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत ओमराजे यांच्यासह सहा खासदार जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. नेटकऱ्यांनी देखील ओमराजे यांना पक्ष सोडून जाण्यावरून ट्रोल केलं. अशातच आज 20 जून 2026 रोजी पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी खटल्याचा निकाल सुनावण्यात आला. या सुनावणीसाठी ओमराजे कुटुंबासह कोर्टा आले होते. अशातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कोर्टाबाहेर आले होते. यामुळे तिथे मोठा गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला, पद्मसिंह पाटील...

नेमकं घडलं तरी काय? 

शनिवारी मुंबईतील सीबीआय कोर्टात ओमराजे हे आपल्या कुटुंबासह वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणी सुनावणीसाठी आले होते. 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर यांच्यावर कळंबोली येथे गोळीबार करण्यात आला होता. अशातच कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी फिल्डींग लावल्याची चर्चा आता समोर येऊ लागली आहे. 

कोर्टाबाहेरची परिस्थिती काय?

मात्र, कोर्टाबाहेरची परिस्थिती पाहता, मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड होताना दिसते. ओमराजे बाहेर पडतानाच त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. ठाकरेंच्या एकनिष्ठ व्यक्तींपैकी ओमराजे यांचे नाव चर्चेत होते, मात्र आता ओमराजे यांच्यावर काही ठाकरेंचे शिवसैनिक आणि काही जनता नाराज असल्याचे दिसून येते. 

हे ही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्याकांड, आरोपींनी आधीच भोगला आहे 'इतका' तुरुंगवास, आज काय होणार?

जर पक्ष सोडून जायचं होतं तर खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेला कौल घ्यायला होवा होता, अशी मागणी शिवसैनिकांकडून होताना दिसते. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा पद्मसिंह पाटील यांच्याशी असलेल्या कुटुंबाचा व राजकीयदृष्ट्या असलेले वैर याचा राजकारणात तडजोडीसाठी वापर केल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत.