operaton sindoor : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही देश तनावाच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत-पाकिस्तान सीमेवर तनावाचं वातावरण आहे. हे युद्ध थांबावं अशी जगभरातील देशांनी आशा व्यक्त केलीय. शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. सांगण्यात येतंय की, भारतानं एकूण 6 बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला. यालाच प्रत्युत्तर देण्यात भारताला यश प्राप्त झालं. यानंतर आता पाकिस्तानने सर्व एअरबेस बंद केले.
ADVERTISEMENT
दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं भारताविरोधात "ऑपरेशन बनयान उल मरसूस" सुरू केलंय. याद्वारे पाकिस्तानने देशाच्या सुरक्षेत वाढ व्हावी, असा त्यांनी दावा केलाय. दोन्ही देशांमधील असणाऱ्या तनावामुळे दोन्ही देशांत अस्थिरता निर्माण होत आहे. याचा अधिक परिणाम देशांच्या सीमेवरील भागांमध्ये सर्वाधिक जाणवत आहे.
हेही वाचा : रात्र वैऱ्याची... रात्रभर सुरू होते पाकिस्तानचे हल्ले, तुमच्या-आमच्या रक्षणासाठी जीवपाड लढतयं लष्कर!
काय म्हणाले विक्रम मिसरी?
अशातच परराष्ट्र सचिव मंत्री विक्रम मेस्त्री म्हणाले की, आपण पाहिलंच असेल की, पाकिस्तानद्वारे करण्यात आलेले अनेक दावे हे खोटे ठरलेत. ही सर्व माहिती पाकिस्तानी संस्था पसरवत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी विविध लष्करी मालमत्ता नष्ट केल्याचा खोटा दावा केला. सिरसा, सुरतगड, आदमपूरमधील हवाई दलाच्या तळांचा नायनाट केल्याचा खोटा दावा केलाय. मी विनंती करतो की, या सर्व खोट्या दाव्यांना कोणीही बळी पडू नका.
यावेळी कर्नल सोफिया यांनी सांगितलं की, हे खूपच चिंताजनक आहे. पाकिस्तान आजही नागरी विमान कंपन्यांचा वापर कव्हर म्हणून करत आहे. पाकिस्तान लगातार चुकीची माहिती प्रसारित करत आहेत. भारतानं प्रमाणबद्ध आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा : भारताने 6 बॅलिस्टिक मिसाइल डागले, पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर मोठे स्फोट, पाक लष्कराचा दावा
काय म्हणाल्या कर्नल कुरैशी?
पाकिस्तानकडून 26 अधिक जागांवर हल्ले करण्यात आले. यावर कर्नल कुरैशी म्हणाल्या की, श्रीनगरमधून नालियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी पाकिस्तानने हल्ला केला. पहाटे 1:40 वाजता पाकिस्ताननं पंजाब एअरबेसवर हाय-स्पीड क्षेपणास्त्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानच्या नागरी भागांनाही लक्ष्य करण्यचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून अचूक गोळीबार केला जात आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
