पालघर डॉक्टर मारहाण प्रकरण अंगाशी, राहुल घरत यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई तक

07 Sep 2026 (अपडेटेड: 07 Sep 2026, 06:50 PM)

Palghar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयतील डॉक्टर मारहाण प्रकरणात सामील असलेल्या शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरतची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. राहुल घरत यांना निलंबित देखील करण्यात आल्याची घटना आहे.

Palghar News

Palghar News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राहुल घरत यांना निलंबित करून पक्षातून हकालपट्टी

point

'स्वत:च्या हातात कायदा घेणं याला समर्थन नाही'

Palghar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयतील डॉक्टर मारहाण प्रकरणात सामील असलेल्या शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरतची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. राहुल घरत यांना निलंबित देखील करण्यात आल्याची घटना आहे. शिवेसना अशा घटनांना समर्थन देणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका व्यक्त केली. गोव्यात झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मी पुन्हा आमदार होणार’, डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का देताच मनसे नेते राजू पाटलांचं खळबळजनक विधान

'स्वत:च्या हातात कायदा घेणं याला समर्थन नाही'

एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये झालेल्या घटनेबाबत सांगितलं की, संबंधित घटना ही अतिशय दुर्दैवी होती. पुढे त्यांनी स्पष्ट सांगितलं की, डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अयोग्य असून शिवसेना अशा घटनांचे समर्थन करत नाही. रुग्णाबाबत काही गैरप्रकार घडला असल्यास कायदेशीर तक्रार हाच त्यामागील योग्य मार्ग आहे. स्वत:च्या हातात कायदा घेणं याला कधीही समर्थन दिले जाणार नाही. शिवसेना अशा प्रकरणांना कधीही समर्थन देत नाही. 

राहुल घरत यांना निलंबित करून पक्षातून हकालपट्टी

दरम्यान, पुढे ते बोलताना म्हणाले की, या झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांना निलंबित करण्यात येत आहे. एवढंच नसून त्यांची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, डॉक्टरांवरील हल्ला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि शिवसेनेकडून पाठिंबा दिला जाणार नाही. 

हे ही वाचा : आता पुण्यातही Gen-Z संतापले! रस्त्यावर उतरले शेकडो विद्यार्थी, पण नेमकं कारण काय?

या प्रकरणी आमदार पुत्रासह इतर 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी गोविंदांनी डॉक्टरांविरोधात केलेली तक्रार आणि त्यानंतर आमदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेनं पालघरमधील हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी राहुल घरात यांच्याबाबत निर्णय घेतला.