"हे तर करायचंच होतं..देशासाठी हा क्षण...", ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

PM Narendra Modi On Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला.

PM Narendra Modi On Operation Sindoor

PM Narendra Modi On Operation Sindoor

मुंबई तक

• 02:40 PM • 07 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठं विधान केलं

point

"हे तर होणारच होतं, संपूर्ण देशाचं लक्ष..."

point

'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

PM Narendra Modi On Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे एकूण नऊ स्थळ भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या आख्ख्या कुटुंबाचा खात्मा झाला. तर जवळपास 80 दहशतवादी ठार झाल्याचं समजते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी प्रतिक्रिया दिलीय. मोदींनी या हल्ल्ल्याबाबत कॅबिनेट बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्र्यांना माहिती दिली. तसच मोदींनी भारतीय सेनेचं कौतुकंही केलं.

हे वाचलं का?

'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशस्वी ऑपरेशनसाठी कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान मोंदींचं अभिनंदन केलं आहे. या बैठकीत मोदींनी म्हटलं की, हे तर होणारच होतं. संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे होतं.

हे ही वाचा >> 'ऑपरेशन सिंदूर'ने दहशतवादी मसूद अजहरच्या आख्ख्या कुटुंबाचा केला खात्मा! अजहर म्हणाला, "माझाही मृत्यू..."

आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान आहे. तसच कॅबिनेटच्या सर्व सदस्यांनी मोदींचं स्वागत केलं. या संपूर्ण घटनेबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत केंद्राकडून अमित शाहा आणि किरण रिजीजू सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ही बैठक उद्या सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. 

दरम्यान, पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी निष्पाप 26 नागरिकांचे बळी घेतले होते. या हल्ल्यात 17 पर्यटक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन घाटीत पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग केलं होतं. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला भारतानं आज रात्री एअरस्ट्राईक करत पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना उद्ध्वस्त केल्या. या हल्ल्ल्यात जवळपास 90 दहशतवादी ठार झाल्याचं समजते. 

हे ही वाचा >> "आम्ही झोपेत असताना 4 ड्रोन आले आणि सगळंच...", एअर स्ट्राईक्स पाहिलं, तो पाकिस्तानी काय म्हणाला?

    follow whatsapp