Prakash Ambedkar : “शरद पवारांनी, ब्रेकअप स्टंट करून जनतेला मुर्ख बनवू नये”

भागवत हिरेकर

03 Aug 2023 (अपडेटेड: 03 Aug 2023, 07:33 AM)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार यांच्यावर टीका. शरद पवारांनी भाजपसोबत जावे, लोकांना मुर्ख बनवू नये, असं आंबेडकर म्हणालेत.

Maharashtra political News : prakash ambedkar targets ncp supremo sharad pawar after attend narendra modi event.

Maharashtra political News : prakash ambedkar targets ncp supremo sharad pawar after attend narendra modi event.

follow google news

Sharad Pawar vs Prakash Ambedkar : “शरद पवार हे लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याशी करतात”, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं आहे. एकीकडे विरोधकांची आघाडी आकार घेत असताना शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या गौरव सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी गारमेंट आंटी खरं बोललीये असं म्हणत शरद पवारांना खडेबोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक गट वेगळा होऊन सत्तेत सहभागी झाला, तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली गट विरोधी बाकांवरच आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे बंड शरद पवारांच्या संमतीनेच असल्याचे सातत्याने बोलले जात आहे.

वाचा >> शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली; कार्यक्रमात काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, दुसरीकडे विरोधी पक्षांची राष्ट्रीय स्तरावर आकारास आलेली इंडिया आघाडी. या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना शरद पवार आणि नरेंद्र मोदी पुण्यातील कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर दिसले. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांची नाराजी लपून राहिली नाही. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

प्रकाश आंबेडकर शरद पवारांबद्दल काय बोलले?

सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्या गारमेंट आंटीचा फोटो आणि डायलॉग पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर टीका केलीये.

प्रकाश आंबेडकर या ट्विटमध्ये म्हणतात, “जेव्हा तुम्ही एका गोष्टींकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघता, तेव्हा गारमेंट आंटी बरोबर बोलली होती, असं तुमच्या असं लक्षात येतं.”

वाचा >> ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’, राज ठाकरेंचे नरेंद्र मोदींना फटकारे!

“जर तुम्हाला (शरद पवार) द्वेष, जातीयवाद आणि मृत्युंच्या व्यापाऱ्याबरोबर जायचं असेल, तर खुशाल जा. पण, तुम्ही पक्षात फूट पडल्याचा स्टंट करून महाराष्ट्रातील, भारतातील जनतेला मुर्ख बनवू नका. शरद पवार नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकासोबत करतात आणि संसार मात्र दुसऱ्यासोबत करतात”, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

राज ठाकरेंनीही शरद पवारांवर केला होता आरोप

2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील 8 आमदारांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत हे शरद पवारांच्या संमतीने झाल्याचे म्हटलं होतं.

वाचा >> ‘साहेब आणि दादा आजही एकत्रच’, अजित पवारांचं शरद पवारांबद्दल भुवया उंचावणारं विधान

“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच”, असा दावा राज ठाकरेंनी केला होता.

“तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं”, अशी भूमिका राज ठाकरेंनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर मांडली होती.

    follow whatsapp