Priya Phuke Allegations : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमधून महिला अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजंच असताना राज्यातील इतरही जिल्ह्यांमधून तशी प्रकरणं समोर येत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेनं आरोप केला, नंतर त्या प्रकरणात ट्वीस्ट आला. तर दुसरीकडे आता भाजप नेते परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनीही आपली कैफियत माध्यमांसमोर मांडली. फुके कुटुंबावर त्यांनी गंभीर आरोप केलेत.
ADVERTISEMENT
प्रिया फुके यांनी काय आरोप केले?
"मी माझ्या लाडक्या भावांच्या दारात गेले, पण ते माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. पण सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उभ्या राहिल्या" असं म्हणत प्रिया खडसे यांनी बोलायला सुरूवात केली. "मी दीड वर्षांपासून लढतेय. 2012 मध्ये माझं संकेत फुकेशी लग्न झालं. मी लाडकी सून होते, सगळी हॅप्पी फॅमिली होती. मात्र 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. संकेत यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं, मात्र त्यांनी ते लपवून लग्न केलं. नंतर कळलं, तेव्हा मी त्यांना विचारलं. मात्र, त्यांनी मला धमक्या दिल्या. मी माझ्या आईने सांगितल्यानुसार खूप लक्ष देऊन कुटुंबाला सांभाळलं. आम्ही सगळेत आनंदात राहत होतो. मला दोन मुलं आहेत. आमचं चांगलं सुरू होतं. मात्र, त्यांना इन्फेक्शन वाढलं आणि त्यांचा 2022 मध्ये मृत्यू झाला." असं प्रिया फुके म्हणाल्या.
"तू काही बोललीस तर संपवून टाकू..."
आपली कैफीयत मांडताना पुढे त्यांनी सांगितलं की, "त्यानंतर मला धमक्या आल्या. तू काही बोललीस तर मारून टाकू अशा धमक्या दिल्या. त्यानंतर त्यांचे पैशांचे, संपत्तीचे व्यवहार यांनी आपसात करून घेतले. म्हणून, मी संपत्तीबद्दल प्रश्न विचारला आणि आपण एकत्रच आहोत हे सांगितलं. तेव्हा त्यांचा इगो हर्ट झाला, आम्हाला हे का विचारलं असं म्हणत त्यांनी 'तू काही बोललीस तर तुला संपवू अशा धमक्या मला दिल्या."
"देवेनभाऊंना माहिती असूनही त्यांनी..."
"मी आता आईकडे राहते, पोलिसांकडे जाऊन तक्रार करतेय. दीड वर्षांपासून लढतेय. मात्र, मलाच त्रास देण्यात आलाय. सातत्यानं धमकावलं जातंय, माणसं माझा पाठलाग करत असतात. देवेनभाऊंकडेही तक्रार केली, पण त्यांनीही लक्ष घातलं नाही." असंही प्रिया फुके म्हणाल्यात.
"महिला आयोगावर आरोप करताना प्रिया फुके म्हणाल्या, माझ्या तक्रारीरीची महिला आयोगानेही दखल घेतली नाही. माझी तक्रार घेण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत बसवून ठेवतात पोलीस स्टेशनमध्ये. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो, तुझी केस आम्ही बोर्डावर येऊ देणार नाही अशा धमक्या मला मिळत राहतात. मी इथे पत्रकार परिषदेला येतानाही माझ्यामागे काही लोक होते" असं प्रिया फुके म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
