पुणे: शिवसेनेच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केला अन् त्याच्याच भावाच्या...

Pune Crime News : पुण्यातील शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने मजाक मस्तीत हवेत गोळीबार केला. ती गोळी गोळीबार करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मावस भावाच्या खांद्याला लागली होती.

Pune Crime News Shiv Sena worker fired in the air and his own brother was hit by a bullet

Pune Crime News Shiv Sena worker fired in the air and his own brother was hit by a bullet

मुंबई तक

30 May 2025 (अपडेटेड: 30 May 2025, 09:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात पुन्हा गोळीबार

point

हवेत गोळी जाडली अन् मावस भावाच्याच खांद्याला लागली

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचं सत्र थांबायचं नाव घेत नाही. दररोज गोळीबार आणि हत्येच्या घटना सुरूच आहेत. अशा कृत्यांमुळे काही प्रकरणं ही अंगलट येतात. पुण्यातील शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने मजाक मस्तीत हवेत गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मावस भावाच्या खांद्याला लागली होती. ही घटना हडपसर येथील सातववाडीकडे जाणाऱ्या कॅनलरोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 6 वर्ष अफेअरनंतर लग्न.. पहिल्याच दिवशी पतीने सोडून दिलं, 'हे' गुपित आलं समोर अन्..

नेमकं प्रकरण काय? 

पुणे शहरातील हडपसर येथील सातववाडीकडे जाणाऱ्या कॅनलरोड येथे दोन दुचाकी येत होत्या. त्या दोन दुचाकीवर चौघेजण होती. त्यातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मजाक मस्तीत हवेत गोळीबार केला. गोळीबार करणं त्याला महागात पडलं. हवेत झाडलेली गोळी त्याच्याच मावास भावाच्या खांद्याला लागली आहे. गावठी पिस्तुलाने रात्रीच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्याने जखमी तरुणाला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. परिस्थिती गंभीर असून हे प्रकरण गोळीबाराचं असल्याचं पाहून डॉक्टरांनी त्याला एका ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयाने या संबंधित प्रकरणाची माहिती मुंढवा पोलिसांना दिली असता, हे प्रकरण समोर आलं. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, जखमी असणारा तरुण वैभव श्रावण गवळीचे वय 20 आहे. हा मुंढवा पुणे येथील रहिवासी आहे. दरम्यान, ज्याने गोळीबार केला त्याचं नाव सुमित खवळे असे आहे. तसेच त्यांच्यासोबत इतरही मित्रमंडळी होती. हे एका तरुणाच्या वाढदिवसानिमित्त गेले असता, हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

या हल्ल्यात वैभव गवळी नावाच्या तरुणाच्या डाव्या खांद्यालाच गोळी लागली आहे. अशा घटना पुणे शहरात घडू लागल्या आहेत. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेकदा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. 

हेही वाचा : गुरूचा 'या' राशीत प्रवेश, पाहा कसं असेल तुमचं राशीभविष्य!

गोळीबाराची पुण्यात आणखी एक घटना

दरम्यान, नुकताच शिंदे गटाच्या युवा शहराध्यक्षाने स्वत:च्या गाडीवर गोळीबार करत एक बनाव रचला होता. त्याचे कारणंही तसंच होतं. त्याला बंदुकीचं लायसन्स मिळावे यासाठी त्याने हा बनावट हल्ला केल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही घटना समोर आली. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव हे नीलेश घारे असे होते. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 


 

    follow whatsapp