Pune Jain boarding transaction finally cancelled : पुण्यातील जैन बोर्डिंग च्या प्रकरणात धर्मदाय आयुक्त कार्यालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल ट्रस्टच्या बाजूने लागला आहे. संबंधित जागेच्या व्यवहारात विकासकाने माघार घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रस्टच्या नावाने खरेदीखत होणार आहे. त्यामुळे जैन बोर्डिंगबाबत बिल्डर विक्रम गोखले यांनी केलेला व्यवहार आता जवळपास रद्द झालाय. दरम्यान, जैन बोर्डिंगवरुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले होते. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
ADVERTISEMENT
जैन समाजाला अपेक्षित असणारा निर्णय झाला - मुरलीधर मोहोळ
मुरलीधर मोहोळ म्हणाले, जैन समाजाला अपेक्षित असणारा निर्णय झाला. ही सर्वांसाठी समाधानाची बाब आहे. मला असं वाटतं की, जैन समाजाची भावना लक्षात घेऊन सर्वांनी विचार केला. हा व्यवहार रद्द झाल्यास सर्वांचं समाधान होईल. जमीन विकणारे ट्रस्टी आणि जमीन घेणारे गोखले बिल्डर आणि जैन समाज या तीन घटकांपुरता हा विषय होता. असं असताना राजकारण झालं. काही नसताना माझं नाव जोडलं गेलं. कोणालाही हे अपेक्षित नव्हतं. जैन समाजाला राजकारण नको होतं. जागा परत मिळावी, विधायक उपक्रम राबवण्यात यावी, हीच त्यांची भूमिका होती. सर्वांच्या विचाराने व्यवहार रद्द झाला हे चांगलं आहे. काही लोकांनी नको ते स्वार्थ साधून घेतले आहेत.
पुढे बोलताना मोहोळ म्हणाले, व्यवहारात चुकीचं काही झालं की बरोबर झालं? हे सांगणे माझे काही नाही. तो व्यवहार रद्द होणे हे सर्वांच्या हिताचं होतं. मुख्यमंत्री साहेब या विषयात जैन समाजासोबत उभे राहिले आहेत. या प्रकरणात जे काही घडलं याबाबत मीडियाने खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे.1957 सालापासूनचे बोर्डिंगचे कागदपत्र धर्मादाय आयुक्तांकडे आहेत. मला वाटतं हा विषय ट्रस्टचा आहे. चुकीचं काय आहे? ट्रस्ट आणि जैन समाज हा विषय पाहून घेतील. पक्ष माझ्यासोबत होता. भविष्यात मी इंत्यभूत माहिती देईल. वेळ येऊ द्या. माझं नाव कशामुळे घेण्यात आलं? हे संबंधित आरोप करणाऱ्यांनाच विचारा. बोलायचं असेल तर बोलू द्या. लोकशाही आहे. मात्र, प्रसार माध्यमांनी याबाबतचे पुरावे पाहायला पाहिजेत. एवढीच माझी अपेक्षा होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











