Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजप व महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जोगेश्वरी परिसरात झोपडपट्ट्यांसमोर मोठे पडदे लावण्यात आले असून, काँग्रेसने या कृतीला "गरीबी छुपाओ अभियान" असे नाव दिले आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, पंतप्रधान मोदींच्या आगमनाआधी सरकारला झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब नागरिकांची आणि त्यांच्या वास्तवाची लाज वाटतेय, म्हणून त्यांना पडद्यामागे लपवले जात आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसची पंतप्रधान मोदीवर जोरदार टीका
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांची इतकी शरम वाटतेय की पडदे लावून त्यांना लपवण्याची व्यवस्था केली आहे! पडद्यामागे गरीबी, अस्वच्छता, कचरा, बकालपणा आणि लोकांचे दुःख लपवाल, पण भाजपा ची गरीबांबद्दलची घृणा आणि माणुसकीशून्य मानसिकता कशी लपवाल?” असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : बाईक टॅक्सी चालकाने तरुणीला आधी धमकावले, नंतर तिच्यावर लैंगिक शोषण करत... नेमकं काय घडलं?
काँग्रेसने पुढे म्हटलं आहे की, "अहमदाबादमधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाला, मुंबईतील G20 परिषदेला आणि आता पीएम मोदींच्या गोरेगाव दौर्याला प्रत्येक वेळी पडद्यामागे भारताची खरी वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे."
कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या इंडिया मॅरिटाइम वीक 2025 या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या सामुद्रिक अमृत काल व्हिजन 2047 ला गती देण्यावर भर दिला जाणार आहे. मोदी येथे मॅरिटाइम लीडर्स कॉन्क्लेवला संबोधित करतील आणि ग्लोबल मॅरिटाइम सीईओ फोरमच्या अध्यक्षस्थानी देखील असतील.
या दौऱ्यात भारताला जागतिक सामुद्रिक व्यापारातील अग्रणी केंद्र बनवण्याच्या दिशेने काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु त्याचवेळी काँग्रेसकडून सरकारवर “गरीबी झाकण्याचा” आरोप होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने शेवटी जाहीर इशारा दिला आहे की, “मुंबईकर भाजपा आणि महायुतीचा हा अहंकार आणि असंवेदनशीलपणा सहन करणार नाहीत. आम्ही याचा जाहीर निषेध करतो.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महामार्ग रोखले, आंदोलकांकडून भारत बंदचा इशारा, नेमक्या काय आहेत मागण्या?
ADVERTISEMENT











