मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार तोफ डागली आहे. 'मुख्यमंत्री पद हवं यासाठी एकनाथ शिंदे लाचारी करत आहेत. त्यासाठीच पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील किल्ल्यांवर नमो टूरिझम सेंटर सुरू करणार आहेत.' असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर अत्यंत जहरी टीका केली.
ADVERTISEMENT
राज्यातील मतदारांच्या यादीतील घोळ, ईव्हीएम घोटाळा, मतचोरी अशा अनेक मुद्द्यांवरून 1 नोव्हेंबर 2025 रोजी विरोधकांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्याच तयारीसाठी मनसेकडून आज (30 ऑक्टोबर) मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंची शिदेंवर जहरी टीका
'सत्तेत आल्यावर वेडंवाकडं कसंही वागायचं.. सगळ्या शहरांवर त्यांचा डोळा आहे. बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंघळत. आजची बातमी.. आजची बातमी.. म्हणजे किती स्वाभिमान गहाण टाकायचा याला काही मर्यादा? म्हणजे हा विचार मनात येतो कसा? काही बातम्या आल्या आहेत. ज्याचा जीआर देखील आला आहे. हे एकनाथ शिंदेचं खातं..'
हे ही वाचा>> 'कसली चाटूगिरी चालुये... सत्ता असो नसो फोडून टाकणार', राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर जहरी टीका
'काय करतायेत हे जर ऐकाल ना.. नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगाल मला.. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवशीनिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रात पर्यटनांची काही ठिकाणी काढत आहेत. त्याची केंद्र.. त्याला नाव काय दिलंय.. नमो टूरिझम सेंटर्स..'
'ही नमो टूरिझम सेंटर्स कुठे काढतायेत तर.. शिवनेरी, रायगड, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे तिथे हे आता टूरिझमचे सेंटर्स काढायला निघाले आहेत. मी आता सांगतोय. सत्ता असो अथवा नसो.. वर नाही, खाली नाही.. आजूबाजूला नाही कुठेही नाही.. उभं केलं की, फोडून टाकणार.'
'मला स्वत:ला मुख्यमंत्री करणार म्हणून किती लाचारी करायची. बरं हे वर पंतप्रधानांनाही माहिती नसेल की, खाली काय चाटूगिरी चालू असेल. हे कशातून येतं.. तर सत्ता डोक्यात गेली ना.. की, आम्ही वाट्टेल ते करू.. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले असो नाही तर काही असो..'
हे ही वाचा>> मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार? मंत्र्यांच्या बैठकीतून आकडा समोर
'मला मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे.. याच्यासाठी मला ज्यांना-ज्यांना खुश करता येईल त्यांना-त्यांना खुश करावं लागेल.'
'मुंबईमधली जागा अदाणीला द्यायच्या आहेत, देऊन टाका.. तो बोट ठेवल ती जागा देऊन टाकतायेत. हे सगळं येतं सत्तेतून.. सत्ता येते याच्यातून (ईव्हीएममधून).. म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवावं लागेल.' असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधला.
ADVERTISEMENT











