बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल, पहिली प्रतिक्रिया देताना संतापले, म्हणाले...

Rohit Pawar on fake Aadhaar card case, Pune : बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले...

Rohit Pawar on fake Aadhaar card case, Pune

Rohit Pawar on fake Aadhaar card case, Pune

मुंबई तक

30 Oct 2025 (अपडेटेड: 30 Oct 2025, 01:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल

point

रोहित पवार पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले...

Rohit Pawar on fake Aadhaar Card, Pune : काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदार यादीत कशा प्रकारे घोळ घातला जाऊ शकतो? याबाबत एक प्रेझेंटेशन दाखवलं होतं. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने कशाप्रकारे आधारकार्ड बनवलं गेलंय? हे रोहित पवारांनी दाखवलं होतं. मात्र, त्यानंतर बनावट आधारकार्ड प्रकरणात रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी याबाबत भाष्य केलंय.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणीवीसांनी फोन केला असता तर मी स्वत: आलो असतो- पवार

रोहित पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, रोहित पवारांनी पॅनकार्ड केलं. खरंतर ते पॅनकार्ड नव्हतं, ते आधार कार्ड होतं. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. जे आधार कार्ड बनवलं, त्याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, त्यानंतर आम्हाला वाटलं त्यांना कोणतरी चुकीची माहिती दिली. सहजपणे ते त्याच्यावर बोलून गेले. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दोन तासांत एक एफआयआर नोंदवण्यात आला. मी टीव्हीसमोर वोटचोरीबद्दल केलं, त्याबद्दलचा आहे. आधारकार्डचा वापर करुन खोटे मतदार कसे नोंदवले गेले? हे मी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दाखवलं. हा एफआयआर या व्हिडीओसंदर्भात आहे. जर एखादा व्यक्ती अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करत असेल आणि त्याच्याविरोधात कारवाई केली झाली तर काय बोलणार? अशा प्रकारे माझ्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणीवीसांनी फोन केला असता तर मी स्वत: आलो असतो. तुम्ही चिरकुट गोष्टीसाठी पोलिसांचा वेळ घालवला. 40 पैसेवाले भाजपचे सोशल मीडियावरील कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही तक्रार दिली आहे.

दोन धर्मात तेढ निर्माण करणारे कलम माझ्यावर लावले - रोहित पवार

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, दोन धर्मात तेढ निर्माण करणारे कलम माझ्यावर लावले आहेत. धार्मिक तणाव कसा झाला? जाती-धर्मांमध्ये वाद लावण्यासाठी भाजप कशासाठी फेमस आहे आणि मला हे कलम लावला आहेत. हे हास्यास्पद आहे. राणे, पडळकर यांचे भाषण जातीधर्मामध्ये वाद करणारे आहेत. जे कलम यांच्यावर लावायला हवी ती माझ्यावर लावली आहे, भारी भारी कलमे लावली आहेत. देवेंद्र फडणवीस हुशार नेते आहेत, ते वकील आहेत. मी त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात गेले काही महिने वर्ष बोलत आहे. त्याच्यामुळे हे सरकार कुठे ना कुठे अडचणीत आले आहे. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा मी सरकारच्या विरोधात बोलत राहणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...

    follow whatsapp