'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

• 02:13 PM • 01 Aug 2026

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शहा यांनी देशातील युवकांना आवाहन केले. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या.

Amit Shah Speech

Amit Shah Speech

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी'

point

अमित शहांचा तरुणांना सल्ला

point

नेमकं काय म्हणाले?

Amit Shah Speech : पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील तरुण पिढीला लोकमान्य टिळकांनी लिहिलेला 'गीतारहस्य' हा ग्रंथ वाचण्याचे आग्रही आवाहन केले. "युवकांनी भगवद्गीता लोकमान्य टिळक यांच्या दृष्टिकोनातून वाचल्यास ते आयुष्यात कधीही चूक करू शकणार नाहीत, याची मी गॅरंटी देतो," असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. हा ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेचे व्यावहारिक रूप असून, एक सामान्य नागरिक, विद्यार्थी किंवा तरुण दररोजच्या आयुष्यात भगवद्गीता कशी जगू शकतो, याचे उत्तम मार्गदर्शन टिळकांनी या ग्रंथातून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

अजित डोवाल यांचा गौरव

या विशेष कार्यक्रमात देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 2026 चा मानाचा 'लोकमान्य टिळक पुरस्कार' गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेत अजित डोवाल यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत शाह यांनी त्यांचा गौरव केला.

हे ही वाचा : मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं

सांस्कृतिक राष्ट्रवादाबद्दल काय म्हणाले?

लोकमान्य टिळकांच्या विचारांवर प्रकाश टाकताना शाह यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर विशेष भर दिला. "टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला सांस्कृतिक राष्ट्रवादाची जोड दिली. त्यांनी सुरू केलेले गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे केवळ धार्मिक वा सामाजिक उपक्रम नव्हते, तर त्यातून राष्ट्रवादाला सांस्कृतिक राष्ट्रवादात बदलण्याचे महान कार्य त्यांनी केले," असे शाह म्हणाले.

हे ही वाचा : "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं

'आता देश मागे येऊ शकत नाही'

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी त्या काळी दाखवलेली दूरदृष्टी आज प्रत्यक्षात येत आहे. आज भारत देश सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. आता या प्रवासाला कुणीही रोखू शकत नाही किंवा मागे नेऊ शकत नाही; देश याच विचारांच्या दिशेने वाटचाल करत राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.